Join us

इंग्रजी Weak म्हणजे स्वत:ला कमी लेखू नका, स्वप्नील जोशीचा तरुणाईला मंत्र

By महेश गलांडे | Published: December 27, 2020 4:17 PM

स्वप्नीलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आजचा एक अनुभव चाहत्यांसाठी शेअर केला आहे. आज एका चुणचुणीत मुलाला भेटलो! मुंबईत नोकरी शोधतोय! पण English चा न्यूनगंड आहे. म्हणून त्यालाही सांगितलं आणि ट्वीतही करतोय.

मुंबई - मराठी चित्रपट इंडस्ट्रीत चॉकलेट बॉय म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभिनेता स्वप्नील जोशीने तरुणाईला एक मंत्र दिला आहे. स्वप्नील जोशी आपल्या सोशल मीडियावर नेहमीच एक्टीव्ह असतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजिक प्रबोधन आणि चांगल्या गोष्टी तो नेहमीच शेअरही करतो. नुकतेच, त्याने आपल्या ट्विटर आणि इंस्ट्राग्राम अकाऊंटवरुन नवीन वर्षात नवीन व्यवसाय सुरू करत असल्याचंही सांगितलं आहे. तर, आज एक अनुभव शेअर करताना मराठी मुलांना इंग्रजीत कमी असाल तर आत्मविश्वास घालवू नका, असा कानमंत्रच स्वप्नीलने दिलाय.

स्वप्नीलने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन आजचा एक अनुभव चाहत्यांसाठी शेअर केला आहे. आज एका चुणचुणीत मुलाला भेटलो! मुंबईत नोकरी शोधतोय! पण English चा न्यूनगंड आहे. म्हणून त्यालाही सांगितलं आणि ट्वीतही करतोय. 'English यायला पाहिजे ! पण English weak म्हणजे हुशारी, बुद्धिमत्ता नाही, अशा प्रेशर्सना बळी पडून स्वतःला कमी लेखू नका !, असा मूलमंत्र स्वप्नीलने मराठी मुलांना दिलाय. इंग्रजी म्हणजेच सर्वकाही असे नाही, इंग्रजी केवळ संवादाचं एक माध्यम आहे, आपल्या कल्पना, आपली हुशारी, कर्तृत्व आणि इच्छाशक्ती आपल्याला यशस्वी बनवते, असेच स्वप्नीलने चाहत्यांना सूचवले आहे. 

इंग्रजी बोलताना सर्वसाधारणपणे गावकडच्या मुलांना जड जातं. त्यात शहरातील वातावरणात समरस होण्यासाठी अनेक दिवस द्यावे लागतात. तसेच, येथील हायप्रोफाईल लाईफस्टाईल पाहून अनेकजण आपला कॉन्फिडन्स गमावून बसतात. मात्र, इंग्रजी कमी येतय, किंवा बोलताना अडखळतो म्हणून आपण हुशार नाही, असं होत नाही. यापूर्वी कॉमेडियन कपिल शर्मानेही एका जाहिरातीच्या माध्यमातून इंग्रजी म्हणजे सर्वस्व नाही. आपल्यातील कला, आवड आणि हुशारी ही इंग्रजीवर ठरत नसल्याचं सांगितलं होतं. आता, स्वप्नीलनेही चाहत्यांना इंग्रजीमुळे आत्मविश्वास गमावून देऊ नका, असे सांगितलंय 

स्वप्नीलचे समांतर काम सध्या स्वप्नील समांतर वेब सिरीजच्या दुसऱ्या सिझनची तयारी करत आहे. ‘समांतर’ वेबसिरीजच्या पहिल्या सिझनच्या अभूतपूर्व यशानंतर वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनची प्रतीक्षा प्रत्येकालाच लागून राहिली आहे. या सिरीजचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरू आहे. जगभरातील प्रेक्षकांना आता या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाची प्रतीक्षा आहे. दुसऱ्या पर्वाचे चित्रीकरण सध्या पाचगणी येथे सुरु आहे. या चित्रीकरणात नुकतेच स्वप्निल जोशी,  तेजस्विनी पंडित आदी कलाकार सहभागी झाले होते. 

टॅग्स :स्वप्निल जोशीइंग्रजीट्विटर