'पॉकेट एफएम'वर यंदाच्या मान्सूनचा मनसोक्त आनंद घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 05:06 PM2024-08-08T17:06:01+5:302024-08-08T17:10:56+5:30

आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर निवांत क्षण घालवण्याचा आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

enjoy this monsoon season on pocket fm its good option has become available to spend relaxing moment with favourite one | 'पॉकेट एफएम'वर यंदाच्या मान्सूनचा मनसोक्त आनंद घ्या...

'पॉकेट एफएम'वर यंदाच्या मान्सूनचा मनसोक्त आनंद घ्या...

मुंबई, ७ ऑगस्ट २०२४ : पावसाळ्यात प्रत्येक जण आपापल्या कल्पनाविश्वात रमतो, कोणी रोमँटिक होऊन फिरण्याची इच्छा व्यक्त करतो, तर कोणाला चित्रपट पहावेसे वाटतात. कोणाला चमचमीत पदार्थ खाण्यासही आवडतात. पावसाळी ढगाळ हवामान किंवा टिप टिप पडणारे पावसाचे थेंब प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. आता 'पॉकेट एफएम'ची याला जोड मिळणार असून, आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर निवांत क्षण घालवण्याचा आणखी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

सध्या पावसाच्या दमदार सरी कोसळत आहेत. चहुबाजूने निसर्गानेही छानशी हिरवी शाल पांघरली असताना आपल्या आवडत्या, खास व्यक्तीसोबत काही क्षण घालवण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यासाठी चित्रपट,  विविध चवींचे पदार्थ चाखताना मनोरंजनाची जोड, विविध गेम, दूरवर ड्राईव्ह, पावसाळी कँपिंग आदी पर्याय निवडता येतात. पावसाळ्यात हे खास क्षण कायमचे लक्षात राहतील, असे आहेत. परंतु 'पॉकेट एफएम'च्या साह्याने हे क्षण अधिक विलक्षण करता येणार आहेत.

चित्रपट रसिक असाल तर...

तुम्हाला आणि तुमच्या जोडीदारालाही रोमँटिक चित्रपट आवडत असतील तर चित्रपटगृहांमध्ये नव्याने प्रदर्शित झालेल्या 'औरों मैं कहाँ दम था'सारख्या चित्रपटातील मजा-मस्ती, ऊर्जा आणि रोमान्स पाहण्यासाठी जोडीदाराला घेऊन जा किंवा जर पावसाळ्यात तुम्ही घरामध्ये राहणेच पसंत करत असाल आणि प्रिय व्यक्तीबरोबर घरीच दर्जेदार वेळ घालवण्यास प्राधान्य देत असाल तर, 'कभी कभी', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'साथिया', 'जब वी मेट', 'आशिकी-२', 'टू टेल ऑफ लव्ह', 'शेरशाह' यांसारखे सार्वकालीन उत्कृष्ट रोमँटिक चित्रपट  घरी राहून डेट करण्यासाठी योग्य आहेत.

खाद्यपदार्थ अन् मनोरंजन शौकिन...

बाहेर संततधार पाऊस कोसळतोय, वातावरणात छानसा गारवा पसरलाय, अशा या अल्हाददायक क्षणी जोडीदाराबरोबर चमचमीत किंवा आवडीचे खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होणेही स्वाभाविक आहे. ही प्रेमाची भाषाही असू शकते. म्हणूनच जोडीदारासाठी एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जेवणाची किंवा खास पदार्थांची ऑर्डर देऊन निवांत घरात बसा किंवा दोघांनी मिळून काहीतरी स्वादिष्ट पदार्थ बनवा. ग्लासात आवडीचे पेय किंवा थेट वाईन ओतून त्याच्या जोडीला छान रोमँटिक गाणी लावा. 'पॉकेट एफएम' त्यांच्या कार्यक्रमांच्या विस्तृत संग्रहामध्ये काही अनोख्या प्रेमकथाही ठेवतात. आमची सूचना आहे की, तुम्ही ‘ट्रुली मॅडली लव्ह’ किंवा ‘कितनी मोहब्बत है’ ऐकू शकता आणि पावसातील हे क्षण घरीच राहून अधिक रम्य बनवू शकता.

गेमर्स आहात?

जोडीदाराशी स्पर्धा करायची आवड असणाऱ्यांना गेम खेळण्यासारखा दुसरा पर्याय नाही. जोडीदाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी 'द परफेक्ट मॅच', 'कपल्स डाइस अँड स्पाईस' किंवा गूड ओल्ड टॅबू, यूनो आणि जेंगा   हे बोर्ड गेम्स खेळून पहा. तुमच्या नाईट डेटसाठी हे गेम उत्तम पर्याय ठरू शकतात. त्यातही कोण जिंकला किंवा हरला हे महत्त्वाचे नाही, स्मार्ट गेम खेळताना आपसात स्पर्धा करून एकत्र घालवलेल्या वेळेचा नक्कीच आनंद देणारा ठरू शकतो.

रोडीज-

पावसाळ्यात दोघांना एखाद्या दूरवर लांब ठिकाणी जाणे आवडत असेल अतिउत्तम. पावसाळ्यात रस्ते पालथे घालून आयुष्यातील 'रोमँटिक ड्राईव्ह' शक्य असते. त्यात वाटेमधेये प्रेमाचा आणखी एक थर टाकू शकता. गायक अरिजित सिंग किंवा अरमान मलिक यांची आकर्षक ऑडिओ मालिका किंवा रोमँटिक गाणी ऐकून ही ड्राईव्ह अधिक फुलवू शकता. आणि जर तुम्ही खरंच एखाद्या ऑडिओ मालिकेचे चाहते असाल तर 'पॉकेट एफएम'वर 'काशी - एक प्रेम कहानी' किंवा 'ये कैसा रिश्ता है' यासारख्या मालिका ऐकून राईड अधिक विलक्षण बनवू शकता.

साहसी जोडप्यांसाठी...

हल्ली प्रत्येकाला साहसी ट्रेक किंवा बाहेर तात्पुरता मुक्काम करण्याची आवड असते. नव्हे तर तो हल्ली एक ट्रेंडच आला आहे. ज्या जोडप्यांना अशा साहसी ठिकाणी मुक्कामाची किंवा ट्रेक करण्याची आवड असेल त्यांच्यासाठीही खास ठिकाणे आहेत.

१) मुंबई/पुणे : जोडप्यांसाठी तुंगार्ली किंवा पवना तलाव ही सर्वांत छान डेस्टिनेशन्स आहेत. मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेली ही ठिकाणे मुक्कामाचा बेत असणाऱ्यांचे आश्रयस्थान आहे. या ठिकाणी रात्रीच्या चांदण्यांच्या साथीने झोपू शकता. बार्बेक्यू करू शकता आणि काही दर्जेदार वेळही सोबच घालवू शकता.

२)  गुजरात : निसर्गाच्या सौंदर्यात ज्यांना स्वच्छंद व्हायला आवडते, अशा लोकांसाठी सापुतारा हे चांगले ठिकाण नावारुपाला आले आहे. सुरतपासून केवळ काही तासांच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात जोडपी आपला अमूल्य वेळ घालवू शकतात, अर्थपूर्ण संभाषणांचा आनंद आणि निसर्गरम्य दृश्यांचा आस्वादही घेऊ शकता.

Web Title: enjoy this monsoon season on pocket fm its good option has become available to spend relaxing moment with favourite one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई