मुंबई - केंद्र शासनाने आत्मनिर्भर भारत संकल्पनेला अधोरेखित करण्यासाठी नॅशनल इंटिग्रेटेड डेटाबेस ऑफ हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री (NIDHI) ही प्रणाली सुरु केली आहे. यामुळे पर्यटन क्षेत्रातील आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी व्यवसाय सुलभतेला प्रोत्साहन मिळत आहे. यात पर्यटन क्षेत्रातील अधिकाधिक भागीदार घटकांनी सहभाग घेऊन नोंदणी करावी अशा सूचना पर्यटन विभागाने दिल्या आहेत.
या प्रणालीमुळे पर्यटन क्षेत्राचा भौगोलिक प्रसार होत असून, त्याचा आकार, संरचना आणि क्षमता याविषयी अधिक स्पष्टता मिळण्यास मदत होत आहे. तसेच, पर्यटन उद्योगांना नामांकनाचे वर्गीकरण करणे इत्यादी संबंधित सेवा करणे सहज शक्य झाले आहे. निधी पोर्टलची विविध उपलब्ध सुविधांचे मूल्यांकन करण्यास, कुशल मानव संसाधनासाठी आवश्यकता आणि विविध पर्यटनाच्या विकासासाठी धोरणे आणि सुविधा तयार करण्यास मदत होते.
हा उपक्रम टप्प्याटप्प्याने अद्ययावत व सर्वसमावेश करण्यात येत आहे. जेणेकरुन यात केवळ निवासाची व्यवस्थाच नव्हे, तर ट्रॅव्हल एजंट, टूरचालक, पर्यटकांसाठी वाहतूक व्यवस्था टुरिस्ट ट्रान्सपोर्ट ऑपरेटर), खाद्यपदार्थ व्यवस्था फूड अँड बेव्हरेज युनिट्स, ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटर्स कन्व्हेन्शन सेंटर्स आणि टुरिस्ट फॅसिलिटेटर ही सर्व माहिती मिळण्याची प्रक्रिया सुलभ होणार आहे.