बंदूक घेऊन शिरला; म्हणाला, दे कॅश, डायमंड; वांद्रेच्या ज्वेलरी शॉपमधील थरारक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 12:35 PM2023-08-06T12:35:17+5:302023-08-06T12:35:26+5:30

- गौरी टेंबकर-कलगुटकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : वांद्रे पश्चिमेच्या आयनॉक्स या आर्टिफिशल आणि फॅशन ज्वेलरी स्टोअरमध्ये रेनकोट घातलेल्या मास्कधारी ...

entered with a gun; said, give cash, diamond jewelry shops in Bandra | बंदूक घेऊन शिरला; म्हणाला, दे कॅश, डायमंड; वांद्रेच्या ज्वेलरी शॉपमधील थरारक प्रकार

बंदूक घेऊन शिरला; म्हणाला, दे कॅश, डायमंड; वांद्रेच्या ज्वेलरी शॉपमधील थरारक प्रकार

googlenewsNext

- गौरी टेंबकर-कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वांद्रे पश्चिमेच्या आयनॉक्स या आर्टिफिशल आणि फॅशन ज्वेलरी स्टोअरमध्ये रेनकोट घातलेल्या मास्कधारी व्यक्तीने शस्त्राचा धाक दाखवित महिला ‘कॅश और डायमंड दो’ असे म्हणत जबरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या कक्ष ९ने रियाज अहमद अब्दुल गनी वार (२९) या जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रियाज हा मुंबईमध्ये नाव कमाविण्याच्या आणि मोठा माणूस बनण्याचा उद्देशाने आला होता. त्याने झटपट पैसे मिळविण्याच्या नादात शस्त्राचा धाक दाखवत लूटपाट करण्याचे ठरविले. त्यानुसार तो वांद्रेच्या गोन्साल्विस रोड येथील आयनॉक्स ज्वेलर्समध्ये २ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७:४० वाजण्याच्या सुमारास घुसला. त्याने स्टोअर मॅनेजर शबाना रंगीला  (४८) आणि सहकारी शिंदे यांना तीन वेळा  कॅश और डायमंड दो, असे सांगितले. मात्र, त्या घाबरल्या आणि ते पाहून रियाजही पळून गेला. कक्ष ९ मधील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकारामुळे या दुकानासह वांद्रेतील सर्वच दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानुसार कक्ष ९चे प्रभारी पोलिस निरीक्षक दया नायक यांनी याप्रकरणी तपास सुरू केला. तेव्हा आरोपी रियाज हा वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात येणार असल्याची माहिती त्यांना मिळाली. 

त्यानुसार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने सापळा रचला आणि रियाजला ताब्यात घेतले. त्याला कक्ष ९ मध्ये नेऊन त्याची चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. 

ती बंदूक खेळण्यातली नव्हती!
पोलिस सूत्रांच्या म्हणण्यानुसार, रियाजकडे आढळलेली बंदूक ही खेळण्यातली नव्हती. त्यामुळे त्याने ती कुठून आणली, याबाबत चौकशी सुरू असून, ती लवकरच ताब्यात घेण्यात येणार असल्याचेही पोलिसांचे म्हणणे आहे. वांद्रे पोलिसांनी हा प्रकार घडल्यानंतर अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Web Title: entered with a gun; said, give cash, diamond jewelry shops in Bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.