मनोरंजनाने भरलेला थ्रिलरपट
By admin | Published: June 27, 2014 11:15 PM2014-06-27T23:15:23+5:302014-06-27T23:15:23+5:30
सर्वसाधारणपणो चित्रपट म्हटला की त्यात हीरो-हीरोईन आणि एखादा खलनायक हे ठरलेलेच असतात.
Next
>सर्वसाधारणपणो चित्रपट म्हटला की त्यात हीरो-हीरोईन आणि एखादा खलनायक हे ठरलेलेच असतात. अशा वेळी खलनायकाचा पराजय होऊन हीरो-हीरोईन एकत्र येतात, असा नेहमीचा फॉम्यरुला ब:याच चित्रपटांतून पाहायला मिळतो. पण मोहित सुरीने हीरो-हीरोईनचे प्रेम वगैरे टिपिकल बाबींना फाटा दिला आहे. बालाजी कंपनीत बनलेल्या ‘एक व्हिलन’ या चित्रपटात एक नव्हे तर चक्क दोन खलनायक आहेत. दोघांचे मार्ग वेगळे, गुन्हे वेगळे; पण त्यांच्या आयुष्यातील एक वळण त्यांना एकत्र आणते. या खलनायकाला वेगवेगळ्या रंजक अशा शेड्स आहेत.
चित्रपटाची सुरुवात गोव्यात होते. गोव्यातल्या माफिया डॉन (रॅमो फर्नाडिस) च्या गँगमध्ये पहिला व्हिलन गुरू (सिद्धार्थ मल्होत्र) काम करत असतो. त्याच्या आयुष्यात चंचल स्वभावाची आयेशा (श्रद्धा कपूर) येते. दोघांचे प्रेम जमते. त्यानंतर दोघे लग्न करतात. तिच्यामुळे गुरूत बदल होऊन तो वाईट धंदे सोडून नोकरी करायला लागतो. दरम्यान, आयेशा आजारी पडते. तिचा इलाज मुंबईला होऊन ती पूर्ण बरी होते. त्यांना आता बाळही होणार असते. तर दुसरीकडे कथेतला दुसरा व्हिलन राकेश (रितेश देशमुख)चे आयुष्यही सर्वसाधारण कुटुंबाप्रमाणो चालू असते. आपली बायको सुलोचना (आमना शरीफ) आणि एकुलत्या एक मुलाला आनंदी ठेवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न तो करत असतो. याच प्रयत्नांमुळे तो गुन्हेगारीच्या मार्गाला लागतो. इतकेच नाही तर त्यात पूर्णपणो अडक त पुढे जातो. दरम्यान, एक वेळ अशी येते की, राकेशच्या गुन्ह्यांमध्ये आयेशा अडकते. तिथेच कथा वळण घेते. गुरू पुन्हा गुन्हेगारीकडे वळतो. राकेश आणि गुरू यांच्यात प्रभावी टक्कर होऊन चित्रपट संपतो.
वैशिष्टय़े : मोहित सुरीने क्राइम थ्रिलर पद्धतीत हा चित्रपट इतक्या संतुलित पद्धतीने हाताळला आहे की, पुढे काय घडणार, याची उत्सुकता शेवटर्पयत राहते. हेच चित्रपटाचे मोठे वैशिष्टय़ म्हणायला हवे. दोन मुख्य कलाकारांना खलनायक दाखवणो हेही एक आव्हान होते, तेही मोहित आणि टीमने यशस्वीपणो पेलले आहे. दोन खलनायक आणि त्यांची कथा मनोरंजक आहे. त्यांची खलनायक होण्याची कारणोही वेगवेगळी आहेत. एकाची चांगला होण्याची इच्छा असूनही वाईट बनतो, तर दुसरा वाईट बनण्याच्या नादात खलनायक बनतो. एक क्षण असा येतो की, हे दोघेही हीरोच वाटतात. सिद्घार्थ मल्होत्र आणि रितेश देशमुख यांनी आपल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. अँग्री यंग मॅनच्या भूमिकेत सिद्घार्थ आकर्षक वाटतो. त्याने भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. रितेश देशमुखला नेहमी विनोदी भूमिकेत पाहिले आहे. या चित्रपटात त्याचे काम उत्कृष्ट म्हणावे लागेल. याआधी अशा प्रकारच्या भूमिकेत त्याला न पाहिल्याने हा सुखद धक्का ठरतो. आयेशाच्या भूमिकेतील श्रद्धा आत्मविश्वासाने वावरते. तिनेही आपले काम सुंदर केले आहे. राकेशच्या पत्नीच्या भूमिकेतील आमना शरीफची भूमिका आणि अभिनय लक्षवेधी आहे. गायक रेमोने केलेला अभिनयही चांगला आहे. छोटय़ा भूमिकेत तो प्रभाव पाडतो. चित्रपटाचे संगीत ही जमेची बाजू आहे. त्यातले ‘ये गलिया..’ आणि इतरही गाणी छान जमली आहेत. प्राची देसाईने केलेले आयटम साँगही वेगळ्या बाजाचे आहे. याआधी प्राची हॉट गेटअपमध्ये दिसली नव्हती. दिग्दर्शक म्हणून मोहित सुरीने खूप चांगले काम केले आहे.