Join us  

Ganesh Mahotsav: उत्साह मनी, कोकणात निघाले चाकरमानी! गणेशोत्सवासाठी एसटीच्या ३४०० गाड्यांचे आरक्षण फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 10:47 AM

Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोन दिवस उरले असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाच्या स्वागतासाठी दीड लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होत आहेत. गणेशभक्तांना कोकणात सुखरूप पोहोचविण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे. 

मुंबई : लाडक्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे दोन दिवस उरले असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. गणरायाच्या स्वागतासाठी दीड लाखांहून अधिक चाकरमानी कोकणात रवाना होत आहेत. गणेशभक्तांना कोकणात सुखरूप पोहोचविण्यासाठी एसटी सज्ज झाली आहे. गणेशोत्सवासाठीएसटी महामंडळाने सोडलेल्या गणपती विशेष जादा गाड्यांना चाकरमान्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ३१ ऑगस्टपर्यंत सुमारे ३,४१४ गाड्या फुल्ल झाल्या आहेत. यापैकी १,९५१ गाड्यांना ग्रुप बुकिंगचे प्राधान्य मिळाले आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी शनिवारी दिली. 

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गस्ती पथकेगणेशोत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या जादा वाहतुकीची सेवा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी महामंडळाने विशेष लक्ष केंद्रित केले आहे.  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत.  प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी फिरती गस्ती पथके तैनात करण्यात येणार आहेत.  वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी व सुरक्षित-सुरळीत वाहतुकीसाठी गस्ती पथके विशेष दक्षता घेणार आहेत.  कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहन दुरुस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.

गेली दोन वर्षे कोरोनाच्या संकटानंतर यंदा मोठ्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणकडे रवाना होत आहेत. गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांचे नियोजन करते. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. चाकरमान्यांनी सुरक्षित प्रवास म्हणून एसटीच्या जादा गाड्यांना पसंती दिल्याने ३१ ऑगस्टपर्यंत तब्बल ३,४१४ गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. या गाड्यांमधून सुमारे दीड लाखांहून अधिक चाकरमानी प्रवास करणार आहेत. - शेखर चन्ने, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ 

लोकलच्या लेटमार्कचा गणेशभक्तांना बसला फटकामुंबई : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला आहे. बाप्पाच्या स्वागताच्या तयारीसाठी नागरिक शनिवारी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या प्रमुख स्थानकांवर गर्दी उसळली होती. मात्र, मध्य रेल्वे मार्गावरील लोकल उशिराने धावत होत्या. त्यामुळे  प्रवाशांचे हाल झाले.  बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी अखेरचा शनिवार असल्याने नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे दादर, लालबाग, क्रॉर्फड मार्केट, विलेपार्ले बाजारपेठांमध्ये गणेश भक्तांची गर्दी उसळली होती. मध्य रेल्वेच्या अप दिशेकडील जलद लोकल सकाळी १५ ते २० मिनिटाने उशिराने धावत होत्या. त्यामुळे कल्याण, डोबिवली, ठाणे, कुर्ला आणि दादर स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली होती. 

टॅग्स :गणेशोत्सवएसटी