उत्सव वातावरणात बाजारात खरेदीला उत्साह!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:09 AM2021-09-16T04:09:18+5:302021-09-16T04:09:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. उत्सवामध्ये देशात कोरोनापूर्व काळाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांत किरकोळ बाजारात तेजी पाहायला मिळत आहे. उत्सवामध्ये देशात कोरोनापूर्व काळाच्या ८८ टक्के विक्री झाली आहे. देशातील उत्तर भागात ९८ टक्के, तर दक्षिण भागात ९७ टक्के विक्री झाली आहे, अशी माहिती रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या अहवालातून समोर आली आहे.
या अहवालानुसार तत्काळ प्रतिसाद देणाऱ्या रेस्टॉरंटच्या विक्रीत कोरोनापूर्व काळापेक्षा १२ टक्के वाढ झाली आहे. अन्नधान्य आणि किराणा माल विक्रीत ४ टक्के वाढ आहे.
प्रतिक्रिया -
रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणाले की, सणांचा हंगाम जवळ येत आहे आणि लसीकरण मोहीम वाढते आहे. आम्हाला आशा आहे की, यावर्षी देशभरात वेगाने सणासुदीची खरेदी होईल. बहुतेक किरकोळ विक्रेत्यांसाठी सकारात्मक वाढ, काही किरकोळ विक्रेते आणखी चांगली विक्री करण्याची शक्यता आहे. या कोरोनापूर्व पातळीपेक्षा विक्री उत्साहवर्धक आहे. मात्र, तरीही विक्रेते तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सावध पवित्रा घेत आहेत.