Join us

बोरिवलीच्या रक्तदान शिबिरात तरुणांचा उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 4:06 AM

मुंबई : दैवज्ञ समाज आणि ‘लोकमत’ यांच्यातर्फे येथील गोराई रोडवरील, एम.एच.बी. कॉलनी येथील सायली कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित रक्तदान ...

मुंबई : दैवज्ञ समाज आणि ‘लोकमत’ यांच्यातर्फे येथील गोराई रोडवरील, एम.एच.बी. कॉलनी येथील सायली कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात तरुणांचा उत्साह होता. बोरिवली ब्लड बँकेच्या सहकार्याने आयोजित या रक्तदान शिबिरात २० तरुणांनी रक्तदान केले.

या कार्यक्रमात खासदार गोपाळ शेट्टी आणि आमदार सुनील राणे यांनी रक्तदाते आणि डाॅक्टरांचा यथोचित सत्कार केला. बोरिवली दैवज्ञ समाजाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय विजय चौलकर यांचे स्वप्न साकार झाल्याबद्दल खासदार गोपाळ शेट्टी यांनी आनंद व्यक्त केला आणि येथील उद्यानाला नाना शंकर शेठ यांचे नामकरण करण्यासाठी पालिकेत प्रस्ताव सादर करा, अशी सूचना खासदार शेट्टी यांनी स्थानिक नगरसेविका अंजली रेडकर यांना केली. या कार्यक्रमात आमदार सुनील राणे, स्थानिक नगरसेविका अंजली खेडकर, नगरसेविका आसावरी पाटील, नगरसेवक विद्यार्थी सिंह, नगरसेविका बिना दोशी, उत्तर मुंबई भाजप सरचिटणीस दिलीप पंडित, समन्वयक महेश राऊत, दैवज्ञ सोनार समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वैवडे, कार्याध्यक्ष स्वप्न मळेकर, सरचिटणीस श्वेता पावसकर आणि दैवज्ञ सोनार समाजाचे नागरिक मोठा संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी उत्तर मुंबई महासचिव दिलीप पंडित, बोरिवलीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.

फोटो ओळी : खासदार गोपाळ शेट्टी व आमदार सुनील राणे यांच्या हस्ते रक्तदाता हर्ष वगळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शेखर चाचड, बोरिवली दैवज्ञ समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वैवडे, सरचिटणीस श्वेता पावसकर उपस्थित होते.