बोरीवलीत सोलजराथोंन मॅरेथॉन स्पर्धेला 2000 नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद
By मनोहर कुंभेजकर | Published: December 18, 2023 06:06 PM2023-12-18T18:06:03+5:302023-12-18T18:06:20+5:30
भाजप बोरिवली विधानसभा व बचुभाई सामजीभाई ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश झाला यांच्या संयुक्त विद्यमाने सोलजराथोंन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते.
मुंबई : बोरिवली पश्चिम,न्यू एमएचबी कॉलनी, गोराई येथे सोलजराथोंन मॅरेथॉनचे आयोजन केले होते.येथील जनरल अरुणकुमार वैद्य ग्राउंड पासून सुरू झालेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे सदर सोलजराथोंन मॅरेथॉनला सुमारे तरुण-तरुणी,जेष्ठ नागरिक व महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला, यामध्ये दहा किलोमिटर,पाच किलोमिटर, दोन किलो मीटर अश्या तीन केटेगिरीत विद्यार्थी, तरुण -तरुणी स्त्री-पुरुष आणि जेष्ठ नागरिक यांचा ही सहभाग होता.
भाजप बोरिवली विधानसभा व बचुभाई सामजीभाई ट्रस्टचे अध्यक्ष दिनेश झाला यांच्या संयुक्त विद्यमाने सोलजराथोंन मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले होते. बोरिवलीचे स्थानिक आमदार सुनील राणे यांनी फ्लैग ऑफ करुन या स्पर्धेचे उदघाटन केले. यावेळी महिलांसाठी सुद्धा विशेष वॉकथॉन इन सारीचे आयोजन करण्यात आले होते. बोरीवलीच्या अनेक महिलांनी नव्वारी साडी नेसून या स्पर्धेत सहभाग घेतला. २ किमी, ५ किमी १० किमी आणि २ किमी साडी वॉकथॉन होता.10 किमी ला पहिले बक्षीस 21000 रुपये दुसरे बक्षीस 11000 रुपये आणि तिसरे बक्षीस 7000 रुपये असे होते.
तर सर्व साधारण महिला, जेष्ठ नागरिक यांना मिळून एकूण १२८,०००/-चे रोख बक्षिसे देण्यात आली.तर 5 किमीला प्रथम आलेल्या पुरुष, महिला आणि जेष्ठ नागरिकांना 3 सायकली, दुसरे पारितोषिक शूज आणि तिसरे पारितोषिक टी शर्ट दिले. तर महिलांसाठी वॉकथॉन इन सारी या स्पर्धेतील पहिल्या 10 महिलांना पैठणी साडी आणि 40 महिलांना योग मॅट दिले अशी माहिती झाला यांनी दिली. स्पर्धा संपल्यावर बक्षीस वितरण समारंभ झाला. याप्रसंगी भारतीय सैन्य दलातील कर्नल मनचंदा व माजी सैनिक कमांडो मधुसूदन सुर्वे, माजी नगरसेविका बिना दिशी आणि आयोजक दिनेश झाला उपस्थित होते.