शिवस्मारकाचे संपूर्ण काम कोळी समाजाकडे सोपवावे; कोळी महासंघाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 09:01 PM2018-10-24T21:01:18+5:302018-10-24T21:05:09+5:30

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोळी समाजामध्ये असलेला आदर आहे. त्यामुळेच कोळी समाजाने अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध केला नाही.

The entire work of Shivsmarkar should be entrusted to the Koli community; The demand of the Koli Mahasangh | शिवस्मारकाचे संपूर्ण काम कोळी समाजाकडे सोपवावे; कोळी महासंघाची मागणी

शिवस्मारकाचे संपूर्ण काम कोळी समाजाकडे सोपवावे; कोळी महासंघाची मागणी

Next

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत कोळी समाजामध्ये असलेला आदर आहे. त्यामुळेच कोळी समाजाने अरबी समुद्रातील शिवस्मारकाला विरोध केला नाही. सरकारने याचे गांभिर्य घेतले नाही, परिणामी कोळी समाजाला डावलून सुरु केलेल्या कामाचा परिणाम विपरितच होणार आहे. त्यामुळे या स्मारकाचे काम तात्काळ थांबवावे अशी मागणी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
मुंबईच्या विकासात भूमीपूत्र असलेल्या कोळी समाजाला नेहमीच डावलण्यात आले आहे. यामुळे यापुढे कोळी समाजाला नुसती भरपाई नको तर विकासात देखिल वाटा हवा, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. समुद्राचे उपजत ज्ञान असलेल्या कोळी समाजाकडे या स्मारकाचे कॉन्ट्रक्ट देऊन सहभागी करुन घ्यावे, तरच शिवस्मारकाचे काम पूर्ण होऊ शकेल, असा इशाराही राजहंस टपके यांनी 'लोकमत'शी बोलताना दिला.
दरम्यान, शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी जात असलेल्या बोटींच्या ताफ्यातील एका स्पीड बोटीला अपघात बुधवारी झाला. स्पीड बोट खडकावर आदळून बुडाली. या अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या बोटीवर 25 जण होते. यापैकी 24 जणांना वाचवण्यात यश आले असून सिद्धेश पवार या तरुणाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 
 

Web Title: The entire work of Shivsmarkar should be entrusted to the Koli community; The demand of the Koli Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.