Join us  

वरळीतील इमारतींचे प्रवेशद्वार तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 2:13 AM

वरळी नाक्यावरील कोणार्क एम्प्रेस, कुमकुम टेरेस, शिवशेलार को.आॅप. हाउसिंग सोसायटी आणि लोढा सुप्रीमस या चार इमारतींनी दिवाणी न्यायालयाच्या परवानगीने रस्त्यालगत प्रवेशद्वार बांधले होते

मुंबई : वरळी नाक्यावरील कोणार्क एम्प्रेस, कुमकुम टेरेस, शिवशेलार को.आॅप. हाउसिंग सोसायटी आणि लोढा सुप्रीमस या चार इमारतींनी दिवाणी न्यायालयाच्या परवानगीने रस्त्यालगत प्रवेशद्वार बांधले होते, परंतु महापालिकेने मंगळवारी दुपारी हे प्रवेशद्वार तोडले. याला रहिवाशांनी विरोध केला, परंतु पालिकेने त्यांचा विरोध झुगारून प्रवेशद्वार तोडल्याची माहिती स्थानिक जहाबिया कांथावाला यांनी दिली.प्रवेशद्वार तोडल्यानंतर कांथावाला यांनी वरळी पोलीस ठाणे आणि पालिकेच्या जी/दक्षिण विभागाच्या कार्यालयात धाव घेतली, परंतु पोलीस आणि पालिकेच्या अधिकाºयांनी कांथावाला यांच्याकडे दुर्लक्ष केले.आमच्या इमारतींच्या आवारात बेकायदा पार्किंग केले जाते. गर्दुल्ले ये-जा करत. जवळच्या परिसरातील मुले खेळण्यासाठी येतात. गर्दुल्ल्यांनी या आधी इमारतींमधील महिलांना त्रास दिल्याच्या घटना घडल्याने, या सर्व गोष्टींना आळा घालण्यासाठी प्रवेशद्वार बांधण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही हे प्रवेशद्वार बसविले होते, असेही कांथावाला यांनी सांगितले.पालिकेच्या कार्यालयात गेल्यानंतर, जी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांनी प्रवेशद्वार घेऊन जा, असे सांगितले. त्यानंतर, आम्हाला जप्त केलेले प्रवेशद्वार परत मिळाले, परंतु प्रवेशद्वार लावण्याची परवानगी मिळालेली नाही.