नवउद्योजकांना फायदा होणार, उद्योग विभाग अन् अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात सामंजस्य करार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 03:53 PM2020-12-11T15:53:58+5:302020-12-11T15:55:14+5:30

इंटरनॅशनल बिझनेस इन्क्युबेटर अत्याधुनिक सुविधा असलेल्या कॉर्नेल महा-60 कार्यक्रमाचे रिलायन्स आयटी पार्क, नवी मुंबई येथे स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले असून तसा करार केला आहे

Entrepreneurs will benefit, Department of Industry and Reconciliation Agreement at Cornell University in the United States | नवउद्योजकांना फायदा होणार, उद्योग विभाग अन् अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात सामंजस्य करार

नवउद्योजकांना फायदा होणार, उद्योग विभाग अन् अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात सामंजस्य करार

googlenewsNext
ठळक मुद्देइंटरनॅशनल बिझनेस इन्क्युबेटर अत्याधुनिक सुविधा असलेल्या कॉर्नेल महा-60 कार्यक्रमाचे रिलायन्स आयटी पार्क, नवी मुंबई येथे स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले असून तसा करार केला आहे

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागात आणि अमेरिकेच्या कॉर्नेल विद्यापीठात एक सामंजस्य करार झाला असून याचा फायदा राज्यातील नवउद्योजकांना होणार आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठ, न्यूयॉर्क यांच्या सहयोगाने उद्योजकांसाठी मुंबईत जागतिक दर्जाचे बिझनेस इन्क्युबेटर स्थापन करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली याचा स्वाक्षरी सोहळा आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या दोन वर्षांच्या प्रयत्नांना यश आले असून कॉर्नेल विद्यापीठ, अमेरिका यांनी सामंजस्य करारावर सह्या केल्या.

इंटरनॅशनल बिझनेस इन्क्युबेटर अत्याधुनिक सुविधा असलेल्या कॉर्नेल महा-60 कार्यक्रमाचे रिलायन्स आयटी पार्क, नवी मुंबई येथे स्थापन करण्याचे मान्य करण्यात आले असून तसा करार केला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, डॉ. हर्षदीप कांबळे व पॉल क्राउस, व्हाईस प्रोव्होस्ट, कॉर्नेल विद्यापीठ यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. यावेळी राज्यमंत्री अदिती तटकरे, प्रधान सचिव (उद्योग) वेणुगोपाल रेड्डी, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगण, कॉर्नेल महा-60चे प्रोफेसर ॲलन, कॉर्नेलचे प्रकल्प व्यवस्थापक डेव्हिन बिगॉनेस आणि मिस्टर जॉन कॅलेलिल एक्सईडी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, सिंगापूर आदी उपस्थित होते.

यावेळी देसाई म्हणाले, उद्योजकांसाठी जागतिक दर्जाची सुविधा असलेले बिझिनेस इनक्यूबेटर सेंटर नवी मुंबईमध्ये स्थापित करणे हे महाराष्ट्र सरकारचे खूप मोठे आणि नाविन्यपूर्ण पाऊल आहे. राज्यात नवीन तांत्रिक, उच्च कुशल मनुष्यबळ आणि नाविन्यपूर्ण कल्पना असलेले तरुण उद्योजक आहेत. सदर बिझनेस अॅक्सिलेटर महिलांसह विविध विभागातील समावेश असलेल्या तरुणांसह राज्यातील प्रारंभिक विकासाला उत्तेजन देण्याचे उद्दीष्ट ठेवून या व्यवसायाचा वेग देणारी यंत्रणा बनविण्यात आली आहे. डॉ. हर्षदिप कांबळे हे या कामासाठी कौतुकास पात्र आहेत.

डॉ. कांबळे म्हणाले, 'कॉर्नेल हे जगप्रसिध्द विद्यापीठ प्रथमच अमेरिकेबाहेर अशा प्रकारचे जागतिक दर्जाचे बिझनेस अॅक्सिलेटर स्थापन करीत आहे. अशा प्रकारचा भारतातील हा पहिलाच कोर्स असून कॉर्नेल महा-60 हा कार्यक्रम याअंतर्गत चालणार आहे. तो जवळजवळ वर्षभर निवडक 60 उद्योजकांना प्रशिक्षण देईल आणि त्यांना विद्यापीठाकडून पदविका प्रमाणपत्र मिळेल.

व्हाईस प्रोव्होस्ट पॉल यांनी महाराष्ट्र शासन आणि कॉर्नेल विद्यापीठ यांच्यातील सामंजस्य करार हा स्वाक्षरी सोहळा ऐतिहासिक असल्याचे म्हटले. तर, कॉर्नेल महा-60 फॅकल्टी डायरेक्टर प्रो. ॲलन यांनी बऱ्याच वर्षांनी या मास्टर सर्व्हिस करारावर स्वाक्षरी होत असल्याने आनंद झाल्याचे सांगितले. कॉर्नेल महा-६० कार्यक्रमाबाबत दूरदृष्टी व सतत पाठपुरावा केल्याबद्दल डॉ. हर्षदिप कंबळे यांचे आभार मानले.
 

Web Title: Entrepreneurs will benefit, Department of Industry and Reconciliation Agreement at Cornell University in the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.