Join us

मुंबईतील प्रदूषण कमी करणार वातावरण कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 4:09 AM

मुंबई : वातावरणीयदृष्ट्या सक्षम मुंबईच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याकरिता मुंबई वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ २७ ऑगस्ट रोजी दुपारी ...

मुंबई : वातावरणीयदृष्ट्या सक्षम मुंबईच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकण्याकरिता मुंबई वातावरण कृती आराखड्याचा शुभारंभ २७ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा ते दीड वाजेपर्यंत करण्यात येणार आहे, अशी मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली.

मुंबईत गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर हवामान बदलास सामोरे जावे लागते आहे. मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असून, प्रदूषणाला थोपविण्यासाठी सरकारी आणि स्वयंसेवी पातळीवर मोठे काम होते आहे. विशेषत: कृती आरखडा तयार करण्यापासून कार्यवाही करण्यापर्यंत प्रशासन काम करत आहे. मुंबईचा शाश्वत विकास व्हावा, प्रदूषण कमी व्हावे, विकास आराखड्यात स्वच्छ शहराला स्थान मिळावे यासाठी काम केले जात आहे. यावर एक उपाय म्हणून मुंबई महापालिकेने शहराचा पहिला वातावरण कृती आराखडा तयार केला आहे.

वर्ल्ड रिसोर्सेस इंन्स्टिट्यूट इंडिया, सी फोर्टी सिटीज नेटवर्क यांच्या मदतीने हे काम केले जात आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे, धोरण आखणे, पर्यावरण शुद्ध करण्यासाठीच्या आव्हानांचा सामना करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे; अशा उपाययोजना करण्यात येणार आहेत. जैवविविधता जोपासणे, शाश्वत विकास करणे, जलस्रोतांचे व्यवस्थापन करणे, हवेची गुणवत्ता वाढविणे यासारखी कामे याद्वारे केली जाणार आहेत.