Join us

‘फ्रायडेज फॉर फ्युचर’च्या माध्यमातून पर्यावरणाचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 5:42 AM

संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत स्वीडनच्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग हिने पर्यावरणाच्या हानीबाबत केलेल्या भाषणांमुळे अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले;

मुंबई : संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत स्वीडनच्या सोळा वर्षांच्या ग्रेटा थनबर्ग हिने पर्यावरणाच्या हानीबाबत केलेल्या भाषणांमुळे अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले; आणि याच काळात पर्यावरण संवर्धनासाठी उभ्या राहिलेल्या ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या चळवळीने मुंबईतही मुहूर्तमेढ रोवली. केवळ मुंबईत नाही तर जागतिक स्तरावर पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून सुरू झालेला हा लढा आता मुंबईतही लढला जात आहे. मरिन ड्राइव्ह येथे शुक्रवारी फ्रायडेज फॉर फ्युचरअंतर्गत पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत मुंबईकरांना या चळवळत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.निखिल काळमेघ, हृतिक उप्पाला आणि पूजा दोमाडिया ही युवा पिढी मुंबईतून पर्यावरण संवर्धनासाठी आवाज उठवित आहे. मुंबईतल्या ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या चळवळीबाबत निखिलने अधिक माहिती देताना सांगितले की, आमची चळवळ, आमचा लढा हा क्लायमेट चेंज आणि ग्लोबल वॉर्मिंगबाबत जनजागृती व्हावी यासाठी सुरू आहे. आमचे ग्लोबल स्ट्राइक तीन महिन्यांनी होत असतात.याबाबत निर्णय स्वत: ग्रेटा घेते. आमचे असे तीन ग्लोबल स्ट्राइक मुंबईत झाले आहेत. हे तीन ग्लोबल स्ट्राइक मोठे होते. मागच्या वेळेला म्हणजे २७ सप्टेंबरला वांद्रे येथे जो ग्लोबल स्ट्राइक झाला; याबाबत ग्रेटाने निर्णय घेतला होता. या ग्लोबल स्ट्राइकमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होतात. या व्यतिरिक्त ८ मार्चपासून आम्ही दर शुक्रवारी सर्वसाधारण ग्लोबल स्ट्राइक करतो. असे आमचे मुंबईत ४४ ग्लोबल स्ट्राइक झाले आहेत. हे ग्लोबल स्ट्राइक आम्ही जनजागृतीसाठी करत आहोत. हे ग्लोबल स्ट्राइक प्रत्येक स्टेशनवर होतात. आणि या माध्यमातून आम्ही नागरिकांना पर्यावरणाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संवर्धनावर भर देतो.>कार्बन उत्सर्जनामुळे पृथ्वी तापतेय. तापमानवाढीचे दुष्परिणाम हवामान बदलाच्या रूपाने दिसत आहेत. हे रोखण्यासाठी उत्सर्जन कमी करावे लागेल. मात्र विविध देशांतील नेत्यांचे एकमत होत नाही. परिणामी धोका वाढला. त्यामुळे ग्रेटाने संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण परिषदेत नेत्यांना खडे बोल सुनावले होते.>हॅशटॅग#ग्लोबलक्लायमेटस्ट्राइक#क्लायमेटइमर्जन्सी#अ‍ॅक्टनाऊ#क्लायमेटअ‍ॅक्शन