मुलुंड : कागद, गोटीव पेपर, कार्डपेपर आणि कपडय़ांनी साकारलेली गुहा, त्यात वावरणारा 16 फुटांचा कागदी साप, गुहेत असणारे वटवाधूळ आणि अशाच गुहेत विराजमान झालेला मुलुंडचा इकोफ्रेंडली राजा म्हणजेच गणपती बाप्पा. या इकोफ्रेंडली राजाच्या भक्तांनी एक पाऊल पर्यावरणासाठीचा ध्यास घेत ‘झाडे वाचवा, झाडे जगवा’ हा संदेश दिला आहे.
गेल्या 19 वर्षापासून मुलुंड पश्चिमेकडील शांतीनगर रहिवासी संघ इकोफ्रेंडली गणोशोत्सव साजरा करीत आहे. प्रत्येक वर्षी पर्यावरणाला पूरक ठरणारा विषय घेऊन त्याबाबत जनजागृती करण्याचा जणू विडाच त्यांनी उचलला आहे. या मंडळाने या वर्षी झाडे वाचवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वाढते शहरीकरण, त्यामुळे होणारी जंगलतोड अशाने झाडे नाहीशी होत आहेत.
झाडेच नसली तर पृथ्वीचे काय होणार, ही जाणीव गणोशभक्तांमध्ये निर्माण करण्यात येत आहे. पालिका अथवा खाजगी कारणास्तव झाडांची छाटणी केल्यानंतर त्यांच्या फांद्यांची विल्हेवाट नीट लावली जात नाही. या फांद्यांचा वापर देखाव्यात करण्यात आला आहे. मंडळाने पालिकेकडून 5क् रोपे घेतली आहेत. या रोपांची देखरेख करण्यासाठी संघातील लहानग्यापासून मोठय़ांर्पयत सारेच सज्ज आहेत.
देखाव्याच्या मार्गातही दोन्ही बाजूला शोभेची झाडे लावण्यात आली आहेत. झाडाच्या कुंडीमध्ये बाप्पाला अर्पण करण्यात येणारे हार, फुले टाकण्यात येतात; जेणोकरून त्यांचा वापर खत म्हणून करता येईल, असे मंडळाचे अध्यक्ष मोसेस पीटर यांनी सांगितले. मंडळास भेट देणा:यांना एक रोपदेखील भेट
देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)