पर्यावरणपूरक ‘विजयनगर’ सोसायटी

By Admin | Published: July 8, 2016 04:10 AM2016-07-08T04:10:44+5:302016-07-08T04:10:44+5:30

गेली ५४ वर्षे एकत्र कुटुंबाप्रमाणे राहणारे अंधेरी येथील विजयनगर सोसायटी आदर्श सोसायटी आहे. गुण्यागोविंदाने राहण्यासोबतच येथील रहिवासी पर्यावरणपूरक प्रकल्पही राबवतात. त्यामुळे अंधेरीतील

Environmental 'Vijayanagara' Society | पर्यावरणपूरक ‘विजयनगर’ सोसायटी

पर्यावरणपूरक ‘विजयनगर’ सोसायटी

googlenewsNext

- लीनल गावडे, मुंबई

गेली ५४ वर्षे एकत्र कुटुंबाप्रमाणे राहणारे अंधेरी येथील विजयनगर सोसायटी आदर्श सोसायटी आहे. गुण्यागोविंदाने राहण्यासोबतच येथील रहिवासी पर्यावरणपूरक प्रकल्पही राबवतात. त्यामुळे अंधेरीतील हटके आणि सगळ्यांना आवडणारी अशी ही पर्यावरणपूरक विजयनगर सोसायटी आहे.
अंधेरी पूर्व येथील स्वामी विवेकानंद मार्गावर विजयनगर सहनिवास सोसायटी वसलेली आहे. या सोसायटीत १४ इमारती असून, ५१५ कुटुंबे सोसायटीत वसली आहेत. १९६२ सालापासून वसलेली ही कुटुंबे असून, २०१०मध्ये येथील इमारतीचा पुनर्विकास करण्यात आला. या सोसायटीचे विशेष सांगायचे झाले तर सोसायटी नेहमीच पर्यावरणपूरक कामांना प्राधान्य देते. याविषयी पर्यावरण प्रकल्प राबविणाऱ्या सुकृता पेठे सांगतात की, येथे राहणाऱ्या आणि न राहणाऱ्यांनाही आमची सोसायटी आवडते. याचा अभिमान वाटतो. या सोसायटीतील ज्येष्ठ नागरिक हे आमचे वैभव आहे. सोसायटीतील प्रत्येक रहिवासी विधायक कामासाठी पुढाकार घेत असल्यामुळे येथे नव्या योजना अंमलात आणायला फार आवडतात. तर सोसायटीचे सचिव प्रसाद पेंडसे सांगतात की, सोसायटीत अनेक उपक्रम राबविले जातात. सोसायटीत तब्बल १४ इमारती असून, सगळ्यांचाच विधायक कामांमध्ये सहभाग असतो. सोसायटीत ज्येष्ठ नागरिक संघ, युवा मंडळ तसेच महिला मंडळे आहेत.

सांडपाण्याचेही व्यवस्थापन : शून्य कचरा प्रकल्पासोबतच येथील सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात आला आहे. दैनंदिन कामासाठी वापरलेल्या पाण्यावर पुन:प्रक्रिया केली जाते. आणि ते पाणी पुन्हा वापरात आणले जाते; शिवाय पाण्याचा वापर योग्य व्हावा यासाठी सोसायटीकडून जलधारा नियंत्रण नळदेखील बसविण्यात आले आहेत.

Web Title: Environmental 'Vijayanagara' Society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.