Join us

Coronavirus: कोरोना विषाणूची महामारी; मुंबईतील प्रवास पडतोय खिशाला भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2020 2:46 AM

रिक्षा, टॅक्सीचालक जवळचे भाडे लॉकडाऊनआधीही नकोच बोलायचे. आताही नकोच बोलत आहेत. शेअरिंग प्रवास करणे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारे आहे.

मुंबई : मागील तीन महिने मुंबईतील सार्वजनिक वाहतूक सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध नाही. परिणामी, नोकरदार वर्गाचे हाल झाले आहेत. रोजंदारीवर काम करणाऱ्या कष्टकरी वर्गाला सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईतून प्रवास करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवास करायचा आहे. टॅक्सी, रिक्षामध्ये दोनपेक्षा जास्त प्रवासी बसू शकत नाहीत. त्यामुळे इतर प्रवाशांचे भाडेदेखील स्वत:च्या खिशातून द्यावे लागणार आहे. लोकलची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद आहे. बेस्ट, एसटीची सेवा अपुरी आहे. तरओला, उबेर सेवा सामान्यत: परवडणारी सेवा नाही. परिणामी, मुंबईतील प्रवास खिशाला न परवडणारा होणार आहे.

मुंबई महानगरात उपनगरीय लोकल सेवा, मुंबई अंतर्गत बेस्ट सेवा नोकरदार वर्गाचा आधार आहे. सार्वजनिक वाहतुकीमुळे तुटपुंज्या पगारात वाहतूक खर्च कमी होतो. मात्र लॉकडाऊनमुळे संपूर्ण आर्थिक चक्र बदलले आहे. आता प्रवासी खर्च डोईजड होणार आहे. निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय लोकल सेवा १५ जूनपासून सुरू झाली. आता सुमारे ७०० लोकल फेºयांमधून अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी प्रवास करीत आहेत. तर, बेस्टमधून २ हजार ९२६ फेºयांमधून मुंबईकर प्रवास करीत आहेत. ३१ जून रोजी सुमारे ८ लाख ९५ हजार ३८८ प्रवाशांनी प्रवास केला.

मुंबईतील रिक्षा, टॅक्सी सेवा पुरेशा प्रमाणात सुरू आहे. काही रिक्षा, टॅक्सी चालक मीटरप्रमाणे पैसे आकारत आहेत. मात्र शेअरिंग टॅक्सी, रिक्षा चालविणे चालकांना परवडत नाही. कारण एका वाहनात फक्त दोनच प्रवासी बसू शकतात. शेअरिंग प्रवास करायचा असल्यास प्रवाशांना जादा पैसे आकारून प्रवास करावा लागत आहे.मुंबई महानगरात राहणाºया प्रवाशांना मुंबईत येण्यासाठी खूप कष्ट करावे लागणार आहेत. लोकल फक्त निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी सुरू आहे. डिझेलचा खर्च वाढल्यामुळे खासगी वाहनाने येणे खर्चीक झाले आहे. एसटीमधून अत्यावश्यक आणि खासगी कंपनीत काम करणाºयांना प्रवासास मुभा आहे. मात्र ज्यांच्याकडे ओळखपत्र नाही, त्यांना प्रवास करण्यास अडचणी येत आहेत.बेस्ट, एसटीच्या अपुºया फेºयागर्दी, रांगा, एकमेकांमधील अंतर राखून बेस्ट, एसटीचा प्रवास करावा लागत आहे. बेस्ट, एसटीच्या अपुºया फेºयांमुळे सर्व प्रवाशांना ही सुविधा मिळत नाही. स्थानकात रांगा लागत आहेत. पोलिसांनी जागोजागी नाकाबंदी सुरू केल्यामुळे बेस्ट, एसटी बस वाहतूककोंडीमध्ये अडकत आहेत.जवळचे भाडे नकोच : रिक्षा, टॅक्सीचालक जवळचे भाडे लॉकडाऊनआधीही नकोच बोलायचे. आताही नकोच बोलत आहेत. शेअरिंग प्रवास करणे प्रवाशांच्या खिशाला कात्री लावणारे आहे. बेस्टमध्ये २३ प्रवासी बसून आणि ५ प्रवासी उभे राहून प्रवास करू शकतात. त्यामुळे बस थांब्यावर येऊनही अनेकवेळा बसचा प्रवास करणे शक्य होत नाही.सार्वजनिक वाहतुकीला फटकालॉकडाऊन काळात बेस्ट, एसटीची सुविधा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी होती. लॉकडाऊनच्या ८५ दिवसांनी लोकल सेवा निवडक अत्यावश्यक सेवेतील कर्मचाºयांसाठी आहे. बेस्ट, एसटी, रेल्वे यांना सामान्य प्रवाशांकडून मिळणारा महसूल बंद झाला आहे. एसटी सेवेचे आर्थिक गणित पूर्णत: बिघडले आहे. परिणामी, एसटीचे आर्थिक नियोजन वेळेत करण्याची मागणी कर्मचारी संघटनेची आहे.

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरसबेस्टटॅक्सी