Join us

वानखेडे स्टेडियमवर आज होणार ऑस्ट्रेलियाविरुद्ध तुल्यबळ लढत; विराट सेना सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 2:42 AM

गेल्या वर्षी आॅस्टेÑलियाने भारत दौºयामध्ये ५ सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली होती

मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत बाजी मारून यंदाच्या वर्षाची विजयी सुरुवात केल्यानंतर टीम इंडिया मंगळवारपासून एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या तगड्या आव्हानाचा सामना करेल. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना वानखेडे स्टेडियमवर होणार असून, पहिल्या सामन्यात बाजी मारत दोन्ही संघांचा विजयी सुरुवात करण्याचा निर्धार आहे. त्यामुळेच मुंबईमध्ये या दोन्ही तुल्यबळ संघांतील कडवी टक्कर अनुभवण्याची संधी क्रिकेटप्रेमींना मिळेल.

इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामन्यानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळेल. त्यात पहिल्याच सामन्यात बलाढ्य कांगारूंचे आव्हान असल्याने भारताला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यासह सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेल्या मार्नस लाबुशेन यांच्या समावेशाने आॅस्टेÑलियाची फलंदाजी तगडी दिसत असली, तरी त्यांना जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि नवदीप सैनी अशा वेगवान माऱ्याचा सामना करायचा आहे.

दुसरीकडे, पॅट कमिन्स, केन रिचडर््सन आणि अनुभवी मिशेल स्टार्क हेही विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल आणि शिखर धवन यांचा समावेश असलेल्या भारताच्या मजबूत फलंदाजीची परीक्षा घेण्यास सज्ज आहेत. तरी यावेळी सर्वांची नजर असेल ती लाबुशेनवर. कसोटी क्रिकेटमध्ये खोºयाने धावा काढल्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यात तो कशा प्रकारे खेळतो याचीच उत्सुकता क्रिकेटप्रेमींना आहे.याआधी दोन्ही संघ इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेत एकमेकांविरुद्ध खेळले होते. त्यावेळी शिखर धवनने धमाकेदार शतक ठोकून भारताला सहजपणे विजयी केले होते. मात्र या सामन्यात झालेल्या दुखापतीनंतर तो विश्वचषक स्पर्धेतून बाहेर झाला आणि त्यानंतर त्याला आपला फॉर्मही टिकवता आला नाही. असे असले, तरी त्याने श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत शानदार अर्धशतक ठोकून कांगारूंना एक प्रकारे इशाराच दिला आहे.

वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजीस पोषक मानली जाते. येथे कायमच धावांचा पाऊस पडलेला पाहण्यास मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संघ दोन्ही मनगटी फिरकी गोलंदाजांना खेळविणार नसल्याचे जवळपास निश्चित आहे. त्यात आॅस्टेÑलियाविरुद्ध घेतलेल्या हॅटट्रिकचा फायदा कुलदीपला मिळू शकतो आणि या जोरावर त्याची अंतिम संघात निवड होऊ शकते.गेल्या वर्षी आॅस्टेÑलियाने भारत दौºयामध्ये ५ सामन्यांची मालिका ३-२ अशी जिंकली होती. विशेष म्हणजे त्यावेळी मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून विराट सेनेने झोकात सुरुवात केली होती. मात्र यानंतर कांगारूंनी जबरदस्त पुनरागमन करत सलग तीन सामने जिंकत दिमाखात मालिका विजय मिळवला होता. या पराभवाचा हिशेबही यजमानांना चुकता करायचा असेल.आॅस्टेÑलियाने भारताविरुद्ध आतापर्यंत ७७, तर भारताने आॅस्टेÑलियाविरुद्ध५० विजय मिळवले आहेत.भारतामध्ये आॅस्टेÑलियाने यजमानांविरुद्ध २९, तर भारताने मायदेशात कांगारुंविरुद्ध २७ विजय मिळवले आहेत.२०१३ सालापासून दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी १३ विजय मिळवले आहेत.२०१३ सालापासून भारताने मायदेशात आॅस्टेÑलियाचा ९ वेळा, तर आॅस्टेÑलियाने भारतात भारताचा६ वेळा पराभव केला आहे.२०१३ सालापासून दोन्ही संघांमध्ये झालेल्या २८ एकदिवसीय सामन्यांत २५ वेळा ३०० हून अधिक धावसंख्या उभारण्यात आली आहे.दोन्ही संघांच्या फलंदाजांनी मिळून एकूण ३५ शतके ठोकली आहेत.कोहलीचा फलंदाजी क्रम बदलण्याचीशक्यताभारतीय कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजी आणि त्याच्या क्रमाबाबत तसेच संघातील सलामीवीराच्या निवडीबाबत बरीच चर्चा सुरू आहे. या सर्व प्रश्नांची विराटने सूचक उत्तरे दिली. ‘जो खेळाडू चांगल्या लयीत असेल तो नेहमी संघाला हवाहवासा असतो. तुमच्या संघात तुम्हाला सर्वोत्तम खेळाडू हवे असतात. ते खेळाडू अंतिम झाले की मग त्यांच्या जबाबदाºया वाटून दिल्या जातात,’ असे कोहलीने सांगितले.तो म्हणाला,‘सध्याचा फॉर्म पाहता रोहित, शिखर आणि राहुल हे तिघेही संघात एकाच वेळी खेळू शकतात. मैदानावर आम्हाला कसा समतोल साधायचा आहे त्यावर सगळं अवलंबून आहे,’ असे सूचक उत्तरही विराटने दिले. ‘मी फलंदाजीत तिसºया स्थानाऐवजी खालच्या स्थानावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे झाल्यास आनंदच असेल. मी कोणत्या क्रमांकावर खेळतो याबाबत मी फारसा आग्रही नाही. फलंदाजीच्या क्रमाबाबत माझ्या मनात असुरक्षिततेची भावना नाही. त्यामुळे फलंदाजीच्या क्रमात बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आपले लक्ष्य दीर्घकालिन असायला हवे,’असेही कोहलीने स्पष्ट केले कोहलीने यावेळी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचेही कौतुक केले. तो म्हणाला की, ‘बुमराह नेहमीच पूर्ण ताकदीने मारा करतो. तो नेट्समध्येही फलंदाजांच्या डोक्याचा आणि बरगड्यांचा वेध घेतो. माझ्या मते तो क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारातील सर्वात कौशल्यपूर्ण गोलंदाज आहे. तो नेट्समध्येही एखादा सामना सुरु असल्याप्रमाणेच मारा करतो. फलंदाजांविरुद्ध भेदक मारा करण्यात तो कधीच बिचकत नाही.’सामन्याची वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून.भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांड्ये, केदार जाधव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमी.आॅस्टेÑलिया : अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स, अ‍ॅश्टन एगर, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेजलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचडर््सन, स्टीव्ह स्मिथ, मिशेल स्टार्क, एश्टन टर्नर, डेव्हिड वॉर्नर आणि अ‍ॅडम झम्पा.

टॅग्स :भारतआॅस्ट्रेलिया