जोगेश्वरीच्या सुसज्ज कोविड आयसोलेशन सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:07 AM2021-05-10T04:07:03+5:302021-05-10T04:07:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जोगेश्वरी पश्चिमेतील मोमीन नगर येथे ८०० निवासी घरे तसेच मोठी गृहनिर्माण सोसायटी आहे. येथील ...

Equipped Covid Isolation Center at Jogeshwari | जोगेश्वरीच्या सुसज्ज कोविड आयसोलेशन सेंटर

जोगेश्वरीच्या सुसज्ज कोविड आयसोलेशन सेंटर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जोगेश्वरी पश्चिमेतील मोमीन नगर येथे ८०० निवासी घरे तसेच मोठी गृहनिर्माण सोसायटी आहे. येथील नागरिकांना कोविडची बाधा झाल्यानंतर तत्काळ रुग्णालय उपलब्ध व्हावे यासाठी येथील नागरिकांनी एकत्र येऊन २४ बेडचे सुसज्ज कोविड आयसोलेशन सेंटर उभे केले आहे.

या सेंटरमध्ये ८ रूम असून प्रत्येक रूममध्ये ३ अद्ययावत बेड, ऑक्सिजनची सुविधा, २४ तास दोन डॉक्टर्स, तीन नर्स, कोविड रुग्णांसाठी लागणारी औषधे, अशा प्रकारच्या सुसज्ज सुविधा आहेत.

या कोविड आयसोलेशन सेंटरला मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य समिती अध्यक्षा व शिवसेनेच्या महिला विभाग संघटक राजुल पटेल यांनी नुकतीच भेट दिली. यावेळी वर्सोव्याचे शिवसेनेचे उपविभागप्रमुख राजेश शेट्ये उपस्थित होते.

या सेंटरमध्ये दाखल रुग्णांना आपण घरच्या घरीच उपचार घेत असल्याची भावना निर्माण होऊन सदर रुग्णांचे मानसिक बळ वाढण्यास मदत होते. त्यामुळे रुग्ण लवकरात लवकर बरा होताे, अशी माहिती यासीन चौधरी यांनी राजुल पटेल यांना दिली.

ऑक्सिजन साठ्याचे योग्य नियोजन हेही या सेंटरचे वैशिष्ट्य आहे. तसेच आतापर्यंत येथे दाखल झालेल्या २९० रुग्णांपैकी २८० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहितीही चौधरी यांनी दिली. कोविड काळात मोमीन नगर येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन नागरिकांना अशी सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल राजुल पटेल यांनी त्यांचे कौतुक केले व भविष्यात आणखी चांगले काम करण्यासाठी योग्य ते साहाय्य करण्याचे आश्वासन येथील नागरिकांना दिले.

------------------------------

Web Title: Equipped Covid Isolation Center at Jogeshwari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.