मुंबई : लिफ्ट, एस्कलेटर्स आणि एलिव्हेटर्समुळे होणारे अपघात, त्यांची जबाबदारी निश्चित करणे आदींचा समावेश असलेल्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज मंजुरी देण्यात आली. या संबंधीचे विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे.लिफ्टसंदर्भात आधीपासूनच कायदा होता पण एस्कलेटर्स, एलिव्हेटर्सही आता कायद्याच्या चौकटीत आणण्यात येणार आहेत. त्यासाठी महाराष्ट्र उद्वाहन, सरकते जिने व चलित पथ अधिनियम-२०१७ हा नवीन कायदा करण्यात येणार आहे.नवीन तंत्रज्ञानानुसार विकसित लिफ्ट, एस्कलेटर्स आणि एलिव्हेटर्स यांची उभारणी, देखभाल आणि सुरक्षितता, उपाययोजना, निरीक्षण शुल्क, विमा संरक्षण, शासनाला मिळणारा महसूल इत्यादी तरतुदींचा विचार नवीन कायद्यात करण्यात आला आहे.
एस्कलेटर्सही कायद्याच्या चौकटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 4:48 AM