चार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरणातून पलायन, हॉटेलच्या पाहणीत महापौरांनी केले उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 01:41 AM2021-02-18T01:41:31+5:302021-02-18T01:41:58+5:30

Mumbai : मुंबईत २३ डिसेंबर २०२० नंतर आलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाची तपासणी करून त्यांना १४ दिवसांच्या विलगीकरणात ठेवले जात आहे.

The escape of four international passengers from the segregation, revealed by the mayor in a hotel inspection | चार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरणातून पलायन, हॉटेलच्या पाहणीत महापौरांनी केले उघड

चार आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे विलगीकरणातून पलायन, हॉटेलच्या पाहणीत महापौरांनी केले उघड

Next

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आल्यानंतर डिसेंबरपासून मुंबई विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात येते. मात्र, सांताक्रुझ (पूर्व) येथील हॉटेलमध्ये विलगीकरणातील चार प्रवासी पळून गेल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी केलेल्या आकस्मिक पाहणीतून उजेडात आले. 
      याची गंभीर दखल घेऊन संबंधित प्रवाशांचा शोध घेऊन त्यांच्यावर व हॉटेलमालकावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मुंबईत २३ डिसेंबर २०२० नंतर आलेल्या प्रत्येक आंतरराष्ट्रीय प्रवाशाची तपासणी करून त्यांना १४ दिवसांच्या विलगीकरणात ठेवले जात आहे. आखाती व इतर देशांमधून येणाऱ्या अशा काही आंतरराष्ट्रीय प्रवाशांना सांताक्रुझ (पूर्व) येथील हॉटेल साई इनमध्ये ठेवले होते. या हॉटेलची महापौर, उपमहापौर सुहास वाडकर यांनी बुधवारी अचानक पाहणी केली. यावेळी चार प्रवासी पळून गेल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनाशोधून त्यांचे विलगीकरण करण्याचे निर्देश महापौरांनी पालिका अधिकारी व पोलिसांना  दिले.

हाॅटेलमालकांना देणार सक्त ताकीद
पालिका कर्मचाऱ्यांनी संबंधित प्रवाशांना हॉटेलमध्ये सोडल्यानंतर त्यांची संपूर्ण जबाबदारी हॉटेलमालकावर असते. प्रवासी पळून गेल्यानंतर हॉटेलमालकाने पोलीस ठाणे व पालिकेला कळविणे गरजेचे होते; परंतु त्यांनी कळविले नाही, असे महापौरांनी सांगितले. अन्य देशांत कोरोनाची स्थिती भयंकर असतानाही प्रवाशांना पळून जाण्यास हॉटेलमालक सहकार्य करीत असल्यास ही बाब चिंताजनक आहे. याकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधून सर्व हॉटेलमालकांना सक्त ताकीद देणार असून, प्रवाशांवरही कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
 

Web Title: The escape of four international passengers from the segregation, revealed by the mayor in a hotel inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.