मुंबई : प्रबोधन कुर्ला गणेशोत्सव मंडळ पल्लवी फाउंडेशनच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन संस्कृती अभियानांतर्गत ही स्पर्धा होणार असून विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि पालकांनाही भाग घेता येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत १०० पारितोषिके दिली जाणार असून विजयी स्पर्धकांना मोबाईलवर निकाल कळविण्यात येईल.
निबंध पाठविण्याची अंतिम तारीख २० सप्टेंबर असून स्पर्धकांनी स्वतःच्या हस्तक्षरात फुलस्केप पेपरवर निबंध लिहून तो गणपती मंडळाच्या पेटीत टाकावा अथवा pkps1998@gmail.com या ई-मेलवर पाठवावा. निबंधाच्या खाली स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता संपर्क क्रमांक लिहिणे आवश्यक आहे. पहिले ते दुसरीसाठी - माझी ऑनलाइन शाळा (४० ते ६० शब्द), तिसरी ते चौथी - मी फळा बोलतोय (६० ते १०० शब्द), पाचवी ते सहावी - माझी मातृभाषा मराठी (१०० ते १५० शब्द) सातवी ते आठवी - वाचनाने घडतो माणूस (१५० ते २०० शब्द) नववी ते दहावी - मराठी संतकवी आणि महाराष्ट्र (२०० ते २५० शब्द) , शिक्षक तसेच पालकांसाठी मातृभाषेतून शिक्षण काळाची गरज (२५० ते ३०० शब्द) असे स्पर्धेचे विषय आहेत. स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता पल्लवी सभागृह, प्रबोधन कुर्ला शाळा, विठ्ठल मंदिर, न्यू मिल कुर्ला (पश्चिम) येथे होणार आहे.