मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे लिमिटेड या कंपनीची स्थापना आज राज्य सरकारने केली. या कंपनीच्या भागभांडवलापैकी ५१ टक्के हिस्सा हा राज्य रस्ते विकास महामंडळाचा असेल. केंद्र सरकारच्या मान्यताप्राप्त विदेशी कंपन्यांची यात गुंतवणूक वा सहमालकी तसेच सरकारमान्य विदेशी गुंतवणूक करणाºया कंपन्यांची भागिदारी किती असावी ते तपासून ठरविण्याचा अधिकार राज्य रस्ते विकास महामंडळाला असेल.>विस्तारासाठी संपादनऔरंगाबाद येथील विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरणासाठी जमीन संपादनाची कार्यवाही ही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी करणार आहे. त्यासाठीचे मोजणी शुल्क एमएडीसीकडून जिल्हाधिकारी कार्यालयात भरण्यात येणार आहे.
समृद्धी महामार्गासाठी कंपनीची स्थापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 6:07 AM