लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एसटीतील काेराेनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कामगार अधिकारी हे या समन्वय कक्षाचे अध्यक्ष असतील, तर आस्थापना शाखेतील पर्यवेक्षकीय अधिकारी, वाहतूक शाखेतील पर्यवेक्षकीय अधिकारी, यांत्रिक शाखेतील पर्यवेक्षकीय अधिकारी हे या कक्षाचे सदस्य असतील. ही समिती एसटीतील काेराेनाबाधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना बेड, ऑक्सिजन आणि रुग्णवाहिका मिळवून देण्यास मदत करतील.
उशिरा सुचलेले शहाणपण
एसटीमध्ये दिवसाला २०० कर्मचारी बाधित होत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कुठल्याही विशेष उपाययोजना एसटी प्रशासनाने तीव्रता लक्षात आल्यानंतरही सुरू केलेल्या नाहीत. काेराेना चाचणी झाल्याचे सांगूनही अहवाल यायच्या आधीच कामावर येण्याची बळजबरी काही आगारात केली जाते. एवढ्या मोठ्या प्रमाणात जीव गेल्यानंतर आता परिपत्रक काढून समन्वय कक्ष नेमणे हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. काही निर्दयी आगार व्यवस्थापकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस
..............................