नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी केश शिल्प मंडळाची स्थापना, अध्यक्षपदी सुधीर राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2019 06:05 AM2019-09-17T06:05:01+5:302019-09-17T06:05:04+5:30

राज्यातील नाभिक समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Establishment of a hairstyle sculpture board for the development of the nucleus community | नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी केश शिल्प मंडळाची स्थापना, अध्यक्षपदी सुधीर राऊत

नाभिक समाजाच्या प्रगतीसाठी केश शिल्प मंडळाची स्थापना, अध्यक्षपदी सुधीर राऊत

googlenewsNext

मुंबई : राज्यातील नाभिक समाजाच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य केश शिल्प मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या मंडळाच्या अध्यक्षपदी नागपूर येथील भाजपचे माजी नगरसेवक सुधीर उर्फ बंडू
राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाभिक समाजाने महाराष्ट्र सरकारला दिलेल्या निवेदनानुसार राज्यात जवळपास ३५ लाख इतकी नाभिक समाजाची लोकसंख्या आहे. नाभिक समाजाच्या सदस्यांना आर्थिक प्रगतीसाठी मदत करणे, त्यांच्या पारंपारिक व्यवसाय आधुनिक पद्धतीने विकसित करण्यासाठी प्रशिक्षण देणे, व्यवसायासाठी आवश्यक साधन सामुग्री देणे, ही कामे प्राधान्याने
या मंडळामार्फत करण्यात येणार आहेत.

Web Title: Establishment of a hairstyle sculpture board for the development of the nucleus community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.