Join us

अनाथ बालकांसाठी समर्पित कक्षाची स्थापना; शहर, जिल्ह्यात 'अनाथ पंधरवडा'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 9:52 PM

अनाथ मुलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, या उद्देशाने स्थापना

श्रीकांत जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: शहर, जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी अनाथ पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. पात्र बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता व्हावी याकरिता मुंबई जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.

अनाथ मुलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, याकरिता महिला बालविकास विभागामार्फत प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराच्या आई व वडीलांचा मृत्यु दाखला, अर्जदाराचा जन्म दाखला, नगरसेवक यांचा बालकांचे अनाथ प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी दाखला, रहिवासी दाखला, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड, फोटो कॉपी आदी कागदपत्रे अनाथ बालकांना पंधरवड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यान्वित आहे, असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी सांगितले.