राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना; शिक्षणाची गुणवत्ता राखून सुसूत्रता आणण्याचे उद्दिष्ट

By स्नेहा मोरे | Published: June 9, 2023 06:58 PM2023-06-09T18:58:45+5:302023-06-09T18:59:06+5:30

राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नुकताच याविषयीचा शासननिर्णय जाहीर केला.

Establishment of State Level Quality Assurance Cell aim is to streamline the quality of education | राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना; शिक्षणाची गुणवत्ता राखून सुसूत्रता आणण्याचे उद्दिष्ट

राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना; शिक्षणाची गुणवत्ता राखून सुसूत्रता आणण्याचे उद्दिष्ट

googlenewsNext

मुंबई - राष्ट्रीय उच्चतर शिक्षण योजनेंतर्गत प्रत्येक राज्यात शिक्षणाची गुणवत्ता राखून सुसूत्रता आणण्यासाठी राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाने नुकताच याविषयीचा शासननिर्णय जाहीर केला. त्यानुसार, राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाचे मूल्यांकन व गुणवत्ता वाढीसाठी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना सहभागी करुन घेण्यात येणार आहे.

राज्यस्तरीय गुणवत्ता हमी कक्षाच्या अध्यक्षस्थानी राज्य प्रकल्प संचालनालयाचे प्रकल्प संचालक असणार आहेत. तर अध्यक्षांसह एकूण नऊ सदस्यांचा समावेश आहे. या कक्षाचे काम वाढल्यावर त्यानुसार त्याचा विस्तार करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणात ज्याप्रमाणे गुणवत्तेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे येत्या काळात शैक्षणिक क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार आहेत. त्याच धर्तीवर या कक्षाच्या सात उद्दिष्टे ठेवून त्यानुसार काम करण्यात येणार आहे.

असे असेल कक्षाचे कार्य
राज्यातील शैक्षणिक गुणवत्ता दर्जा वाढविण्याच्या अनुषंगाने महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकनाचे मानांकन वाढविणे. महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन करुन घेण्याासटी येत असलेल्या अडचणींच्या अनुषंगाने मार्गदर्शन करणे. विद्यापीठ व संलग्नित महाविद्यालयाच्या शैक्षणिक लेखा परीक्षणाचा आढावा घेणे. विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या कार्याचा आढावा घेणे. विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाला शैक्षणिक लेखापरिक्षणाची व क्षमता विकासाची प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी मार्गदर्शन करणे. मूल्यांकनाच्या प्रगतीचे संनियंत्रण करणे व त्याबाबतची प्रगती गतीमान करण्यासाठी उपाययोजना सुचविणे. शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी अन्य उपाययोजना सुचविणे.

Web Title: Establishment of State Level Quality Assurance Cell aim is to streamline the quality of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.