आस्थापनांची नोंदणी आॅनलाइन
By admin | Published: November 9, 2015 03:19 AM2015-11-09T03:19:50+5:302015-11-09T03:19:50+5:30
मुंबई शहर आणि उपनगरांतील आस्थापनांची नोंदणी आता आॅनलाइन करता येणार असून, नूतनीकरणही आॅनलाइन करता येणार आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील आस्थापनांची नोंदणी आता आॅनलाइन करता येणार असून, नूतनीकरणही आॅनलाइन करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नूतनीकरणासाठी मोबाइल अॅपचा पर्यायही उपलब्ध झाल्याने महापालिकेचे कामकाज आता ‘स्मार्ट’ झाले आहे.
नोंदणी व नूतनीकरणात सुलभता, तत्पर व किफायतशीर सेवा देण्याबाबत विविध प्रक्रिया व नियमात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यामार्फत आस्थापनांचे नोंदणीकरणात व नूतनीकरणात सुलभता, तत्पर व किफायतशीर सेवा देण्याबाबत आस्थापनांची नोंदणी हे इंटरनेद्वारे आॅनलाइन व नूतनीकरण हे इंटरनेद्वारे आॅनलाइन/मोबाइल अॅपद्वारे सुरू करण्यात आले आहे. यासंबंधीची सेवा नोंदणीकरणाकरिता व नूतनीकरणाकरिता विभागीय नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. तसेच आस्थापनांचे नोंदणीकरण हे इंटरनेद्वारे आॅनलाइन व नूतनीकरण हे इंटरनेद्वारे आॅनलाइन/ मोबाइल अॅपद्वारे सुरू झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी नोंदणी व नूतनीकरण हे सुलभतेने व तत्परतेने होण्याकरिता सेवेचा लाभ घ्यावा. ही सेवा इंटरनेद्वारे आॅनलाइन करण्याकरिता www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर आणि मोबाइल अॅपद्वारे करण्याकरिता www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर जाऊन MCGM 24 X 7 वर उपलब्ध करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)