Join us

आस्थापनांची नोंदणी आॅनलाइन

By admin | Published: November 09, 2015 3:19 AM

मुंबई शहर आणि उपनगरांतील आस्थापनांची नोंदणी आता आॅनलाइन करता येणार असून, नूतनीकरणही आॅनलाइन करता येणार आहे.

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील आस्थापनांची नोंदणी आता आॅनलाइन करता येणार असून, नूतनीकरणही आॅनलाइन करता येणार आहे. महत्त्वाचे म्हणजे नूतनीकरणासाठी मोबाइल अ‍ॅपचा पर्यायही उपलब्ध झाल्याने महापालिकेचे कामकाज आता ‘स्मार्ट’ झाले आहे.नोंदणी व नूतनीकरणात सुलभता, तत्पर व किफायतशीर सेवा देण्याबाबत विविध प्रक्रिया व नियमात सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने मुंबई महापालिकेच्या दुकाने व आस्थापना खात्यामार्फत आस्थापनांचे नोंदणीकरणात व नूतनीकरणात सुलभता, तत्पर व किफायतशीर सेवा देण्याबाबत आस्थापनांची नोंदणी हे इंटरनेद्वारे आॅनलाइन व नूतनीकरण हे इंटरनेद्वारे आॅनलाइन/मोबाइल अ‍ॅपद्वारे सुरू करण्यात आले आहे. यासंबंधीची सेवा नोंदणीकरणाकरिता व नूतनीकरणाकरिता विभागीय नागरी सुविधा केंद्रांमध्ये सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत उपलब्ध असणार आहे. तसेच आस्थापनांचे नोंदणीकरण हे इंटरनेद्वारे आॅनलाइन व नूतनीकरण हे इंटरनेद्वारे आॅनलाइन/ मोबाइल अ‍ॅपद्वारे सुरू झाले आहे. त्यामुळे संबंधितांनी नोंदणी व नूतनीकरण हे सुलभतेने व तत्परतेने होण्याकरिता सेवेचा लाभ घ्यावा. ही सेवा इंटरनेद्वारे आॅनलाइन करण्याकरिता www.portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर आणि मोबाइल अ‍ॅपद्वारे करण्याकरिता www.portal.mcgm.gov.in  या संकेतस्थळावर जाऊन  MCGM  24 X 7  वर उपलब्ध करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी)