पॉर्नोग्राफी प्रकरणात एसआयटी स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:07 AM2021-08-14T04:07:33+5:302021-08-14T04:07:33+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याच प्रकरणात आणखी काही जणांवर ...

Establishment of SIT in pornography case | पॉर्नोग्राफी प्रकरणात एसआयटी स्थापन

पॉर्नोग्राफी प्रकरणात एसआयटी स्थापन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांकडून एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. याच प्रकरणात आणखी काही जणांवर अटकेची टांगती तलवार कायम आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली तपास होणार असून, मुंबई गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची नियुक्ती या एसआयटीवर करण्यात आली आहे. त्यांच्या मदतीसाठी पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी त्यांच्या टीममध्ये असणार आहेत.

पॉर्न फिल्म रॅकेट संदर्भातल्या सर्व गुह्यांचा तपास एसआयटीमार्फत केला जाणार आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात आतापर्यंत शिल्पा शेट्टीचा पती उद्योजक राज कुंद्रासह एकूण १२ जणांना अटक करण्यात आली आहे. यात नुकतेच दिग्दर्शक अभिजित बोम्बलेला मालमत्ता कक्षाने बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Web Title: Establishment of SIT in pornography case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.