Join us

इथियोपियन एअरलाइन कंपनीच्या विमानाला आग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2024 9:21 AM

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानामध्ये सामान चढविण्याचे काम सुरू होते.

मुंबई : मुंबईहून इथियोपियातील अदिस अबाबा येथे जाण्याच्या तयारीत असलेल्या विमानाला अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आणि विमानतळावरही मोठ्या प्रमाणावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी पाचजणांना पोलिसांनी अटक केली आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानामध्ये सामान चढविण्याचे काम सुरू होते. त्या दरम्यान हायड्रोजन स्पिरीट हा अत्यंत ज्वलनशील पदार्थ विमानात चढवला जात होता. तो एका बॅगेमध्ये होता.मात्र, त्या रसायनाने अचानक पेट घेतला. अग्निशमन यंत्रणांनी तातडीने ही आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला. 

  या प्रकरणी पोलिसांनी पाचजणांना अटक केली आहे. समीर विश्वास, विश्वासभाई, नंदन यादव, अखिलेश यादव आणि सुरेश सिंग अशी या पाचजणांची नावे आहेत. ही आग नेमकी कशी लागली आणि संबंधित रसायन उचित परवानगी घेऊन विमानात चढवले जाते होते का, याची आता तपासणी होणार आहे. मात्र, विमान हवेत असताना जर विमानाने पेट घेतला असता तर मोठा अनर्थ झाला असता, अशी प्रतिक्रिया सूत्रांनी दिली.

टॅग्स :विमान