वडिलांचे निधन होऊनही सादर केला नाटकाचा प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2019 01:41 AM2019-11-30T01:41:28+5:302019-11-30T01:41:46+5:30

रंगभूमीवर नाटक सादरीकरणाच्या प्रक्रियेत अनेकदा काही अडचणी अचानक निर्माण होतात. त्यावर यशस्वीपणे मात करत नाट्यप्रयोग सुरळीतपणे सादर केले जातात.

Even after the death of his father, the play was presented | वडिलांचे निधन होऊनही सादर केला नाटकाचा प्रयोग

वडिलांचे निधन होऊनही सादर केला नाटकाचा प्रयोग

googlenewsNext

मुंबई : रंगभूमीवर नाटक सादरीकरणाच्या प्रक्रियेत अनेकदा काही अडचणी अचानक निर्माण होतात. त्यावर यशस्वीपणे मात करत नाट्यप्रयोग सुरळीतपणे सादर केले जातात. ‘शो मस्ट गो आॅन’चे प्रसंग मराठी व्यावसायिक रंगभूमीला नवीन नाहीत; मात्र आता त्यात राज्य नाट्य स्पर्धेच्या रंगमंचाची भर पडली आहे.

गेली अनेक वर्षे राज्य नाट्य स्पर्धेसह विविध एकांकिका स्पर्धा आणि इतर राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांतून युवा रंगकर्मी रवी बनकर सातत्याने कार्यरत आहे़ नाट्यसृष्टीला त्याची सच्चा रंगकर्मी म्हणून ओळखही आहे. याच रवी बनकर याच्या बाबतीत घडलेली एक घटना कुठल्याही रंगकर्मीला हुरूप देऊन जाईल अशीच आहे.

सध्या मुंबईत ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी रंगली आहे. या स्पर्धेचे एक केंद्र असलेल्या साहित्य संघ मंदिरात २६ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता, ‘कलासाधना’ या संस्थेच्या ‘व्हाइट पेपर’ या नाटकाचा प्रयोग होता. या प्रयोगाची सर्व तयारी पूर्ण झाली होती.
आदल्या दिवशी, २५ नोव्हेंबरला नाटकाशी संबंधित सर्व जण नाटकाची तालीम संपवून घरी निघून गेले होते. प्रयोगाचा दिवस उजाडला, तोच एका धक्कादायक बातमीने! या नाटकात सरपंचाची प्रमुख भूमिका रंगवणाऱ्या रवी बनकर याच्या वडिलांचे अचानक निधन झाले. साहजिकच, स्पर्धेचा प्रयोग रद्द करावा लागेल, अशी सर्वांनी अटकळ बांधली.

कलेशी निष्ठा बाळगणाºया रवी बनकर याने आजचा प्रयोग होणारच, असा निरोप या नाट्यसंचाकडे पाठवला. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्य वाटले. इतके करूनच रवी थांबला नाही; तर वडिलांच्या अंत्यविधीचे कार्य पार पाडून तो संध्याकाळी साहित्य संघ मंदिरात प्रयोगासाठी दाखलही झाला. त्यानंतर जणू काही घडलेच नाही, अशा पद्धतीने नाटकाचा प्रयोग रंगत गेला.

इतिहासच घडला
रवी बनकर यांच्या बाबतीत घडलेली घटना ऐकून मी आणि माझे मित्र चाट पडलो होतो. पडदा उघडला, प्रयोग सुरू झाला. रवी बनकरांची एन्ट्री झाली, तसा माझ्या पोटात गोळाच आला. पण त्यानंतर इतिहास घडला. रवी बनकर आणि सगळ्या कलाकारांनी संपूर्ण प्रयोग तन्मयतेने रंगवला. रवी बनकरांच्या वावरण्यात कुठेही कसली उणीव जाणवली नाही. शेवटी टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला; तेव्हा आम्ही सगळेच भारावून गेलो होतो.
- वैभव महाडिक (रंगकर्मी)

Web Title: Even after the death of his father, the play was presented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.