Join us

संप मिटल्यावरही सागाची तोड सुरुच

By admin | Published: September 10, 2014 12:00 AM

वाढीव वेतनश्रेणीसह विविध मागण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या वनपाल, वनरक्षकांचा संप मिटल्यानंतरही जंगलातून सागाची चोरटी तोड सुरु असल्याचे समोर आले

वरपगाव : वाढीव वेतनश्रेणीसह विविध मागण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून बेमुदत संपावर असलेल्या वनपाल, वनरक्षकांचा संप मिटल्यानंतरही जंगलातून सागाची चोरटी तोड सुरु असल्याचे समोर आले असून याकडे वनपाल- वनरक्षक जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.कल्याण तालुक्यात ६ हजार १९१ चौरस मीटर वनक्षेत्र आहे. यामध्ये साग, शिसव, आंबा, निंब, करंज, खैर, मड, पनस, ऐन आदी विविध उपयोगी वृक्ष आहेत. हे जंगल संरक्षित असून याकरिता २७ वनक्षेत्रपाल, वनपाल, वनरक्षक कार्यरत आहेत. खडवली, कल्याण, बापसई, आपटी, केळणी, पोई, कुंदा, पनसोली, मामणोली, आरेला, पोई, आडिवली, फळेगाव आदी परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. वनरक्षक, वनपाल यांनी २५ आॅगस्टपासून बेमुदत संप पुकारला होता. या काळात जंगलचोरांची मोठी टोळी सक्रीय झाली होती. (वार्ताहर)