स्थलांतरित झाल्यानंतरही शाळेत प्रवेश मिळविणे शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 05:56 AM2019-03-04T05:56:16+5:302019-03-04T05:56:25+5:30

ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील चार तालुक्यांमध्ये डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

Even after migrations, it is possible to get admission in school | स्थलांतरित झाल्यानंतरही शाळेत प्रवेश मिळविणे शक्य

स्थलांतरित झाल्यानंतरही शाळेत प्रवेश मिळविणे शक्य

googlenewsNext

- चेतन ननावरे
मुंबई : ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील चार तालुक्यांमध्ये डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पात ऊसतोड कामगारांच्या पाल्याची शैक्षणिक व वैयक्तिक माहिती डिजिटली नोंद केली जाते. त्यामुळे संबंधित कामगार चारही तालुक्यांत कुठेही स्थलांतरित झाल्यास, त्यांच्या पाल्यांना या तालुक्यांतील कोणत्याही शाळेत शैक्षणिक माहितीच्या आधारे त्या-त्या इयत्तेमध्ये प्रवेश देणे सोपे झाले आहे.
या कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहितीसह त्याच्या कुटुंबाचीही माहिती जतन केली जाते. या शैक्षणिक माहितीमध्ये विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम व अन्य संबंधित माहिती नमूद केलेली असेल. जेव्हा विद्यार्थी कुटुंबासह स्थलांतर करतील, त्या वेळी संबंधित विद्यार्थ्याचे शिक्षक हे कार्ड भरून सही व शाळेच्या शिक्क्यानिशी विद्यार्थी स्थलांतरित होत असलेल्या विभागातील शाळेकडे पाठवतील. प्रत्येक स्थलांतर करणाऱ्या विद्यार्थ्याची माहिती डिजिटली संकलित केली जाणार असल्याची माहिती टाटा ट्रस्टचे डेटा ड्रिव्हन गव्हर्नन्सचे
प्रोग्राम मॅनेजर परेश जयश्री मनोहर यांनी
दिली.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात २०१६ साली सुरू झालेला हा प्रकल्प आता पुण्यातील पुरंदर तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण व खंडाळा तालुक्यांत राबवला जात आहे. यातील बारामतीत ६ ते १४ वयोगटातील ८९० विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली होती. त्यातील ६०८ विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आले आहेत. हे विद्यार्थी कुटुंबासह जेथे स्थलांतर करतात, तेथे या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना सहज शाळेत प्रवेश घेता येत असल्याचा दावा ट्रस्टने केला आहे.
हा प्रकल्प अल्पसंख्याक शिक्षण विभागासह सोमेश्वर सहकारी साखर कारखाना यांच्या समन्वयाने टाटा ट्रस्टमार्फत राबवला जात आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाचा विस्तार सातारा जिल्ह्यात करण्यात आला. एकट्या सातारा जिल्ह्यात या प्रकल्पांतर्गत ऊसतोड कामगारांची ८००० शाळाबाह्य मुलेदेखील शिक्षणाच्या प्रवाहात आली आहेत.
>असा होईल कार्डचा उपयोग
डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्डमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक माहितीसह त्याच्या कुटुंबाचीही माहिती जतन केली जाईल. शैक्षणिक माहितीमध्ये विद्यार्थ्याची इयत्ता व अन्य आवश्यक माहिती नमूद असेल. विद्यार्थी कुटुंबासह स्थलांतर करतील, त्या वेळी संबंधित विद्यार्थ्याचे शिक्षक हे कार्ड भरून सही व शाळेच्या शिक्क्यानिशी विद्यार्थी स्थलांतरित होत असलेल्या विभागातील शाळेकडे पाठवतील. या माहितीच्या आधारे तेथील शाळेत प्रवेश घेणे विद्यार्थ्यासाठी सोपे होईल.
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात २०१६ साली सुरू झालेला हा प्रकल्प आता पुण्यातील पुरंदर तालुका आणि सातारा जिल्ह्यातील फलटण व खंडाळा तालुक्यांत राबवला जात आहे. यातील बारामतीत ६ ते १४ वयोगटांतील ८९० विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली होती.

Web Title: Even after migrations, it is possible to get admission in school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.