Join us  

'राज ठाकरे मला भेटले तर...'; अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही बृजभूषण सिंह यांनी दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 4:22 PM

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे.

नवी दिल्ली/मुंबई- मी अयोध्येचा दौरा करणार म्हटल्यावर अनेकजण दुखावले. त्यांनीच अयोध्येत रसद पुरविली आणि मनसे कार्यकर्ते तिथे गेल्यावर त्यांना कसे सापळ्यात अडकवायचे त्यासाठी मदत केली. त्या सापळ्यात आपण अडकू नये, म्हणून अयोध्या दौरा रद्द केला, असं स्पष्टीकरण मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या पुण्यातील सभेत दिलं. 

रेल्वे भरतीच्या जागा महाराष्ट्रात, पण जाहिरात मात्र उत्तर प्रदेशातील वृत्तपत्रात होती. भरतीसाठी उत्तर प्रदेशातून मुले आली होती. त्यांना विचारण्यासाठी कार्यकर्ते गेले होते. त्यातून राडा झाला, असं राज ठाकरे म्हणाले. तसेच जे आत्ता उत्तर प्रदेश, बिहारचं बोलतायत, आंदोलन होऊन १२-१४ वर्ष झाली. तुम्हाला आता जाग आली का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.

राज ठाकरेंनी अयोध्या दौरा रद्द केल्यानंतरही उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा आव्हान दिलं आहे. मी राज ठाकरेंना २००८ पासून शोधतोय. जर ते कधी मला एअरपोर्टवर वैगरे भेटले तर नक्कीच त्यांना हिसका दाखवीन, असं बृजभूषण म्हणाले. तसेच उत्तर भारतीयांविरोधात केलेल्या आंदोलनाबद्दल जोपर्यंत ते माफी मागणार नाही, तोवर त्यांना अयोध्येत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशाराही बृजभूषण यांनी दिला आहे.

राज ठाकरेंविरोधात भाजपनेच रचला होता ट्रॅप? बृजभूषण सिंह यांच्या 'त्या' दाव्याने शंका उपस्थित

राज ठाकरेंचं आता हृदय परिवर्तन झालंय आणि त्यांना अयोध्येला यायचं आहे. राज ठाकरे ज्या कोणत्या उत्तर भारतीय राज्यात जातील, तिथे त्यांना विरोध केला जाईल. माफी मागितल्याशिवाय त्यांना प्रवेश नाही, असं बृजभूषण सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. 

भोंगा आंदोलन सुरूच- राज ठाकरे

भोंगे आंदोलनसुरू केले आणि पहिल्यांदाच असे घडले. पहाटेची अजान बंद झाली. ९४ टक्के भोंग्यांचा आवाज कमी झाला. हे आंदोलन एक दिवसाचे नाही. दोन-चार दिवसांत एक पत्र देणार, ते घराघरांत द्यावे. भोंगा प्रकरणात २८ हजार मनसे सैनिकांना नोटिसा गेल्या. भोंगा आंदोलन इथून पुढे सुरूच राहणार असल्याचे राज यांनी सांगितले.   

टॅग्स :राज ठाकरेउत्तर प्रदेशमनसे