Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 05:45 PM2024-10-24T17:45:58+5:302024-10-24T17:47:03+5:30

Amit Thackeray: 'लोकमत'ला दिलेल्या पहिल्यावहिल्या राजकीय मुलाखतीत अमित ठाकरेंनी दिली दिलखुलासपणे उत्तरं

Even if I become Chief Minister i will be Raj Thackeray son says Amit Thackeray | Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे

Amit Raj Thackeray Exclusive Interview: मी मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन- अमित ठाकरे

मुंबई

मी उद्या मुख्यमंत्री झालो तरी आधी राज ठाकरेंचा मुलगाच असेन आणि राजकारणातून बाहेर पडलो तरी राज ठाकरेंचा मुलगाच असेन. माझ्या वागण्यात कोणताच बदल होणार नाही, असं अमित ठाकरे म्हणाले. 'लोकमत'ला दिलेल्या पहिल्यावहिल्या राजकीय मुलाखतीत ते बोलत होते. 

राज ठाकरे यांचा मुलगा म्हणून राहणं आणि आता एक राजकीय उमेदवार म्हणून वावरणं यात काय फरक वाटतो? असं विचारलं असता अमित यांनी, "मी उद्या मुख्यमंत्री झालो तरी राज ठाकरेंचाच मुलगा असेन. कारण माझ्यासाठी ते नातं जास्त महत्वाचं आहे", असं म्हटलं. तुमच्यकडे कोणतंही पद आलं तरी जमिनीवर राहणं महत्वाचं आहे असंही सांगितलं. 

...त्यामुळे एकनाथ शिंदेंना दोष देता येणार नाही; अमित ठाकरे राजकीय उलथापालथीवर रोखठोक बोलले!

शांत स्वभाव आणि सर्वांशी आज्ञाधारकपणे बोलणं हे जाणीवपूर्वक स्वभावात आणलं का? असं विचारलं असता अमित ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या हजरजबाबी शैलीत उत्तर दिलं. "मी काहीच जाणीवपूर्वक करत नाही. मी आधीपासूनच शांत आहे. लोकं म्हणतात की मी सर्वांशी आज्ञाधारकपणे बोलतो, आदर करतो. याबद्दल माझं कौतुक केलं जातं. तर याचं श्रेय मी खरंतर इतर नेत्यांच्या मुलांना देतो. कारण त्यांनी राजकीय नेत्यांची मुलं कशी असतात याचं जे चित्र तयार केलं आहे ते पाहून लोकं माझं कौतुक करत असतील तर चांगलंच आहे", असं अमित ठाकरे म्हणाले. 

माहिममध्ये कोणतीही तडजोड नाही
"माहिममधून निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही तडजोड केलेली नाही आणि मी करणार देखील नाही. मी स्वत: राज साहेबांना सांगितलं की मी १०० टक्के तयार आहे. माझ्या कामावर मला विश्वास आहे. समोर कुणी उमेदवार आहे की नाही याचा काही मला फरक पडत नाही. तसंच मी अजिबात सेफ मतदारसंघ निवडलेला नाही. या मतदारसंघात आम्ही दोन वेळा हरलोय आणि मला वाटत नाहीय की मी एकदा तिथं लढतोय. इतरही उमेदवार आहेत. पण मी निवडून येईन याची खात्री मला आहे", असंही अमित ठाकरे म्हणाले.

मुलाखतीचा व्हिडिओ लोकमतच्या यूट्यूब चॅनलवर पाहा...

Web Title: Even if I become Chief Minister i will be Raj Thackeray son says Amit Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.