Join us

मुंबई केंद्रशासित करण्याचा केला विचार, तर भाजपा महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचा होणार हद्दपार 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 6:13 PM

मुंबई केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली मागणीने महाराष्ट्राच्या राजकारणाचा पारा टोकाला गेला आहे.

मुंबई - मुंबई केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी केलेली मागणीने महाराष्ट्राच्याराजकारणाचा पारा टोकाला गेला आहे. भाजपाला  महाराष्ट्रातीलराजकारणात  लोणच्या एवढे स्थान देखील उरणार नाही. जनता महाराष्ट्रातील भाजपाला हद्दपार केल्या शिवाय राहणार नाही असे ठाम प्रतिपादन मुंबई काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी केले आहे.

मुंबईला व महाराष्ट्राला कमकुवत करण्याचा भाजपचा अंतस्थ डाव पूर्वी पासून आहे. गेल्या सहा वर्षांत मुंबईची, महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची ज्या पद्धतीनं बदनामी होत आहे. कोरोना मध्ये लोक मरत असताना भाजपाने त्यांचा मदतनिधी केंद्र सरकार कडे पाठविल्याचे लोक विसरलेले नाहीत.

 मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र व इतर उद्योग गुजरातला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, तेंव्हाही फडणवीस सरकार गप्प बसून होतं. पूर्वी मुंबईमध्ये हिऱ्यांचा मोठा उद्योग पंचरत्न बिल्डिंगमध्ये होता. पण आता हळुहळू यातला एक मोठा गट गुजरातला गेलेला आहे. मुंबईचं महत्त्व सतत कमी करायचा प्रयत्न सातत्याने होतोय.

सरकारने पेटंट, डिझाईन आणि ट्रेडमार्कचं ऑफिस दिल्लीला हलवलं. यानंतर नॅशनल मरीन पोलीस अकादमी पालघरहून गुजरातमधल्या द्वारकाला हलवण्यात आली. आता मुंबईच्या पोर्ट ट्रस्ट मध्ये होत असलेलं 'शिप रेकिंग'चं काम गुजरातमधल्या अलंगला नेण्यात येतंय. अशाप्रकारे मुंबईच अवमूल्यन करण्यात येत आहे.

मुंबईवर कर्नाटकचाही हक्क आहे. हे शहर कर्नाटकात असले पाहिजे, अशी कानडी जनतेची भावना आहे. त्यामुळं मुंबई कर्नाटकात येत नाही तोवर हे शहर केंद्रशासित म्हणून घोषित करावे, असं वक्तव्य सावदी यांनी केलं होतं. सावदी हे कर्नाटक भाजपचे मोठे नेते आहेत. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्रात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीतील नेत्यांनी देखील भाजपवर टीकेची तोफ डागली आहे.-

टॅग्स :महाराष्ट्रकर्नाटकराजकारण