... हे तर अधिकच गंभीर, व्हायरल व्हिडिओनंतर फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 04:53 PM2021-05-28T16:53:32+5:302021-05-29T11:01:25+5:30
शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे पोलिसांकडून मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. याप्रकरणी फडणवीसांनी लक्ष घातले आहे.
मुंबई - शहरातील खासगी रुग्णालयात झालेल्या वादाची व्हिडिओ शुटिंग काढण्याच्या कारणावरून भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीसाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमधील घटना ९ एप्रिल २०२१ रोजी घडलेली असून पदाधिकारी गयावया करत माफी मागत आहे. पण, काठ्या तुटेपर्यंत पोलीस त्यास मारहाण करत असल्याचे दिसत आहे. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
शिवराज नारियलवाले (रा. जालना) असे पोलिसांकडून मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस आहेत. याप्रकरणी फडणवीसांनी लक्ष घातले आहे. 'शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हे पत्र शेअरही करण्यात आलंय.
जालना येथील भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस शिवराज नारियलवाले यांना झालेल्या अमानूष मारहाणीच्या प्रकरणात दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्याबाबत मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र.. pic.twitter.com/GfcmL4hyA4
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 28, 2021
डीवायएसपी पदावरील अधिकाऱ्याने अशा पद्धतीने मारहाण करणं हे अतिशय गंभीर आहे. तसेच, राज्यात कायद्याचे राज्य नसल्याप्रमाणे अशा घटना घडत आहेत. त्यावर, सरकारचे मौन हे तर अधिकच गंभीर आहे. समाजमाध्यमांवर किंवा भाजपा कार्यकर्ता किंवा सामान्य माणसाने एखादी प्रतिक्रिया दिल्यास कधी पोलिसांकडून, तर कधी राजकीय कार्यकर्त्यांकडून मारहाणीचे प्रकार घडत आहेत. अलिकडच्या काळात हे प्रकार प्रचंड वाढले आहेत. कायद्याचा धाकच उरला नाही, याप्रकरणी आपण स्वत: लक्ष देऊन दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी पत्राद्वारे केली आहे.
पोलिस निरीक्षक महाजन म्हणतात...
जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन म्हणाले की, ९ एप्रिल रोजी एका खासगी रूग्णालयात अपघात झालेल्या व्यक्ती मरण पावला होता. त्यानंतर काही तरूणांनी येऊन रूग्णालयाची तोडफोड केली होती. जमाव पागविण्यासाठी आम्ही लाठीचार्ज केला होता, असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, या व्हिडिओमध्ये काही दिवसांपूर्वीच दोन लाखांची लाच घेणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर दिसत आहे. याशिवाय, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन व कर्मचारी दिसत आहेत.
पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ