विशेष फेरीतही वाणिज्यचा कटऑफ चढाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:08 AM2020-12-30T04:08:20+5:302020-12-30T04:08:20+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अकरावीच्या विशेष फेरीदरम्यान अखेर महाविद्यालयांच्या कला व विज्ञान शाखांच्या कटऑफमध्ये घसरण दिसून आली. मात्र, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावीच्या विशेष फेरीदरम्यान अखेर महाविद्यालयांच्या कला व विज्ञान शाखांच्या कटऑफमध्ये घसरण दिसून आली. मात्र, वाणिज्य शाखेच्या कटऑफमध्ये झालेली घसरण किंचित आहे.
अकरावी विशेष फेरी १च्या गुणवत्ता यादीनुसार अनेक महाविद्यालयांचे विज्ञान व कला शाखेचे कटऑफ पहिल्यांदाच ७० ते ८० टक्क्यांदरम्यान घसरले आहेत. मात्र, नामांकित महाविद्यालयात ते अजूनही नव्वदीपारच आहेत. वाणिज्य शाखेच्या कटऑफमध्ये केवळ १ ते २ टक्क्यांची घसरण दिसून आली. एकूणच अकरावी प्रवेशात विद्यार्थ्यांचा वाणिज्य शाखेकडे असलेला ओढा व त्या निमित्ताने असलेली स्पर्धा समोर आली.
एचआर, केसी, जयहिंद, रूपारेल, साठे, मिठीबाई, एनएम या महाविद्यालयांतील वाणिज्य शाखेचे कटऑफ हे विशेष फेरीतही नव्वदीपार असल्याने, ८५ ते ९० टक्के मिळलेल्या अनेक विद्यार्थ्यांची या फेरीतही निराशा झाली. एचआर, केसी, जयहिंद, रूपारेल या महाविद्यालयातील कला शाखेचे कटऑफ ९० टक्क्यांच्या वर आहेत, तर विज्ञान शाखेत रुईया, रूपारेल, वझे केळकर या महाविद्यालयांचे कटऑफ ९०च्या वर असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे नामांकित महाविद्यालयात प्रवेशाचे स्वप्न धूसर झाले. प्रवेश घेण्याच्या मुदतीदरम्यान विद्यार्थ्यांना घेतलेले प्रवेश रद्द करता येणार आहेत. मात्र, नियोजित फेऱ्यांमधील ही अखेरची फेरी असल्याने विद्यार्थ्यांनी विचार करून निर्णय घ्यावा, असे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले.
महाविद्यालय - कला- वाणिज्य - विज्ञान (कटऑफ टक्क्यांमध्ये) एचआर - .... - ९१- ....
केसी - ७९- ९० -७३
जयहिंद - ८४- ९०. ४ - ७३. ६
रुईया - ... - ... - ९३. ६
पोदार - ... - .... -.....
रूपारेल- ८६. २ - ९१. ४ - ९०. २
साठे- ७८- ८९. ४ - ८७. २
डहाणूकर - ... - ९१ -....
भवन्स- ७९. ८ - ८७ . ६- ८६ . ६
मिठीबाई - ८८. २ - ९१ - ७६ . ६
एन एम - ..... -९३.६- ...
वझे केळकर - ... - ... - ९३ ...
सेंट झेविअर्स- .... - ... - ८५. ६
...........................