हमारे इजाजतबिना परिंदा भी पर नहीं मार सकता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 11:06 AM2023-02-27T11:06:19+5:302023-02-27T11:06:31+5:30

विमानतळावर प्रवाशाला धमकावत कस्टम अधिकाऱ्यांनी केला मानसिक छळ

Even the bird cannot be killed without our permission, custom officers of airport in trouble | हमारे इजाजतबिना परिंदा भी पर नहीं मार सकता

हमारे इजाजतबिना परिंदा भी पर नहीं मार सकता

googlenewsNext

- आशिष सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :  एअरपोर्ट पर हमारे इजाजत के बिना परिंदा भी पर नहीं मार सकता,  असे सुनावत आणि सोने तस्करीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील दोघा वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्यांनी  आपला मानसिक छळ केल्याची लेखी तक्रार मनोज वलेचा या प्रवाशाने सहार पोलिस ठाण्यात केली आहे. यासंदर्भात अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आल्याचे उच्चपदस्थ कस्टम अधिकाऱ्यांनी सांगितले. 

काही दिवसांपूर्वी व्यावसायिक वलेचा बॅंकॉक येथील मीटिंगला उपस्थित राहण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळावर गेले. इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण करून विमानात प्रवेश करत असतानाच त्यांना पत्नीचा  फोन आला. तिने प्रकृती बिघडल्याचे सांगितल्याने वलेचा यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. इमिग्रेशनवर पोहोचून ते बाहेर पडत असताना कस्टमच्या हवाई गुप्तचर विभागाचे उपायुक्त मनुदेव जैन आणि अधीक्षक युवराज यांनी त्यांना अडवले.  त्यावेळी ते दोघेही नशेत होते. त्यांनी वलेचा यांना केली.  ‘एअरपोर्टपर हमारे इजाजत के बिना परिंदा भी पर नहीं मार सकता’, असे सांगत वलेचांना धमकावू लागले.

उल्हासनगरातील लोक सोन्याच्या तस्करीत सहभागी  असतात असे सांगत वलेचा यांना सत्य सांगण्या सांगितले. तसेच माफी न मागितल्यास मारहाण करण्याची धमकीही दोघांनी दिली.  आपण तस्कर नसून पत्नीने फोन केला म्हणून परतत असल्याचे वलेचा यांनी वारंवार सांगूनही दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. तसेच त्यांची शारीरिक तपासणी करीत कित्येक तास आपला छळ केल्याचे वलेचा यांनी तक्रारीत नमूद केले आहे. यासंदर्भात उच्चपदस्थ कस्टम अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता संबंधितांची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सोने तस्करीच्या वेगवेगळ्या पद्धतींचा सुगावा कस्टमला लागला असल्याने शंका आल्यास प्रवाशांची तपासणी केली जाते, असेही त्यांनी सांगितले. 

... त्यामुळे प्रवासी रडारवर
कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांत सुदान, दुबई तसेच अन्य देशातून सोने घेऊन अनेक प्रवासी मुंबईत येतात. मात्र, ते इमिग्रेशनची प्रक्रिया पार पाडत नाहीत. 
तस्करांच्या टोळीतील दुसरा प्रवासी त्याचवेळी आंतरराष्ट्रीय आणि डोमेस्टिक विमानतळावर हजर असतो. सोने घेऊन आलेला प्रवासी या दुसऱ्या प्रवाशाला सोने देऊन परत निघून जातो. सोने घेणारा प्रवासी त्याच्या विमानाचे तिकीट रद्द करून सोने घेऊन विमानतळाबाहेर पडतो. त्याचमुळे हा प्रवासी रडारवर आला. याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.

Web Title: Even the bird cannot be killed without our permission, custom officers of airport in trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई