मुंबई : शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन दिले जाते. त्यांचे मनोबल आणि पुढील वाटचालीसाठी हातभार म्हणून आंतरजातीय विवाह अनुदान योजनेअंतर्गत जोडप्यांना केंद्र आणि राज्य सरकारचे ५० हजार रुपये एकत्रित असे अर्थसाहाय्य दिले जाते. मात्र, जून २०२१ पासून हे अनुदान थकले आहे. काहींना वितरित झाले, काहींना नाही. त्यामुळे लग्न होऊन आता मुले झाली तरी अनुदान मिळत नाही अशी स्थिती आहे.
जोडप्याला मिळतात ५० हजार ज्या जोडप्यांनी आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केला आहे, त्यांना प्रोत्साहन मिळावे, म्हणून केंद्र आणि राज्य असे एकत्रित ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते.
दोन वर्षांपासून पैसे मिळेनातमुंबईला सध्या तीन कोटींची गरज आहे. जून २०२१ पासूनचे प्रस्तावांचे पैसे येणे बाकी आहे. मार्च २०२३ पर्यंत १६३ मजूर आहेत.
एकूण ६१० प्रस्तावांचे पैसे येणे बाकी ? दिवाळीपासून विवाहांचे प्रमाण वाढले आहे. उपनगरात आंतरजातीय विवाह हे जवळपास १,८०० झाले आहेत. मात्र, विभागाकडे निम्मेसुद्धा प्रस्ताव आलेले नाहीत.
अटी काय ? -जात निर्मूलन करण्यासाठी विभिन्न जात वर्गातील जोडपे अशी प्रमुख अट या योजनेत आहे. जोडप्यांमध्ये कोणीही एक उच्च जात वर्गातला आणि दुसरे कोणीही अनुसूचित जाती, जमातीमधील असावे. वधू आणि वराचे एकत्रित बँक खाते, मागासवर्गीय असल्यास जातीचा दाखला, स्थानिक रहिवासी दाखला, रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, पॅन कार्ड झेरॉक्स, अर्जासोबत स्वयंघोषणापत्र व वधू आणि वर यांचा एकत्रित फोटो आवश्यक आहे.
तीन कोटींची गरज शिल्लक असलेल्या ६१० प्रस्तावांचे पैसे देणे बाकी आहेत. त्यासाठी पैसे मंजूर असून, निधी आलेला नाही. तीन कोटींचा निधी हवा आहे.
विवाह वर्ष ४४० २०२० ४६० २०२१ १८३ २०२२
एकूण ६१० प्रस्तावांचे पैसे येणे बाकी आहे.