Join us

लसीकरणाचे दोन डोस झालेल्यांनाही बुस्टर डोसची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2021 4:07 AM

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण होत आहे. महाराष्ट्राचे लसीकरणाचे काम स्तुत्य असून, देशात सर्वाधिक आहे. ...

मुंबई : महाराष्ट्रात सध्या सुमारे आठ लाख नागरिकांचे लसीकरण होत आहे. महाराष्ट्राचे लसीकरणाचे काम स्तुत्य असून, देशात सर्वाधिक आहे. महाराष्ट्र लसीकरणात आघाडीवर आहे ही अभिनंदनीय बाब आहे. परंतु, लसीचे दोन डोस घेऊनही कोरोनाची लागण होत असल्याने बुस्टर डोस घेणे गरजेचे असल्याचे मत राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केले.

बुस्टर डोस सहा महिन्यांच्या आत द्यावा म्हणजे इम्युनिटी टिकून राहील आणि त्याचा फायदा अपेक्षित तिसऱ्या लाटेत होईल, असे मत डॉ. दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे व्यक्त केले. दि. १६ जानेवारी रोजी लसीचा पहिला डोस घेतला, तर १६ फेब्रुवारी रोजी लसीचा दुसरा डोस घेतला. त्यानंतरही कोविडचा संसर्ग झाल्याने डॉ. दीपक सावंत यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल व्हावे लागले होते. या स्वानुभवातून त्यांनी लसीचे दोन डोस घेतल्यानंतरदेखील बुस्टर डोस घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. त्याप्रमाणे जगात वेगवेगळ्या कंपनीची लस घेण्याचा ट्रेंड सुरू आहे. त्याचाही विचार व्हावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.