Coronavirus: मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी बेड्स नाहीत तरीही रेल्वेतील आयसोलेशन कक्ष रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 10:24 PM2020-06-13T22:24:00+5:302020-06-13T22:26:09+5:30

आयसोलेशन कक्षाचे पुन्हा प्रवासी डब्यात आणि पुन्हा आयसोलेशन कक्षात रूपांतर करण्याचा खेळ सुरू  

Even though there are no beds for coronaviruses in Mumbai, the isolation ward in the train is empty | Coronavirus: मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी बेड्स नाहीत तरीही रेल्वेतील आयसोलेशन कक्ष रिकामे

Coronavirus: मुंबईत कोरोनाग्रस्तांसाठी बेड्स नाहीत तरीही रेल्वेतील आयसोलेशन कक्ष रिकामे

Next
ठळक मुद्देपश्चिम रेल्वे मार्गावरील वर्कशॉपमध्ये आयसोलेशन कक्ष तयार आहेत. एक आयसोलेशन कक्ष तयार करण्यासाठी ७७ हजार ६७८ रुपये खर्च येतोआयसोलेशन कक्षात अजून एकही कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार झाला नाही

मुंबई : मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक कोरोनाग्रस्त रुग्णांना खाटा मिळत नाही. त्यामुळे त्यांना वेगवेगळे पर्यायी मार्ग शोधून खाट मिळवावी लागत आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून ८९२ डब्याचे रूपांतर आयसोलेशन कक्षात केले. मात्र रेल्वेने तयार केलेले आयसोलेशन कक्ष रिकामेच पडून आहेत. त्यामुळे हे आयसोलेशन कक्ष कोणासाठी असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.  मध्य रेल्वेला श्रमिक विशेष ट्रेनची कमतरता जाणवू लागल्याने आयसोलेशन कक्षाचे रूपांतर पुन्हा प्रवासी डब्यात केले गेले होते. मात्र या प्रवासी डब्याचे रूपांतर आयसोलेशन कक्षात केले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून दिली आहे. 

रेल्वे मंत्रालयाकडून आयसीएफ डब्यांचे रुपांतर आयसोलेशन कक्षात करण्याचे ठरविले. रुग्णालयाच्या खाटांची व्यवस्था करणे, प्रवासी डब्यांचे विलगीकरण करून आयसोलेशन कक्ष तयार करण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाला श्रमिक विशेष ट्रेन कमी पडू लागल्या. त्यामुळे देशभरातील आयसोलेशन कक्ष तयार केलेले डबे पुन्हा प्रवासी डब्यात तयार केले. मध्य रेल्वेकडून प्रवासी रेल्वे डब्यांपैकी ४८२ आयसोलेशन वॉर्ड तयार केले होते. मात्र आयसोलेशन कक्षाचा वापर न झाल्याने या गाड्या तशाच पडून होत्या. यासह श्रमिक विशेष ट्रेन वाढविण्यासाठी आयसोलेशन कक्षाचे रूपांतर प्रवासी डब्यात केले. मात्र ज्या प्रवासी डब्याचे रूपांतर केले होते, त्या डब्यांना पुन्हा आयसोलेशन कक्षात रूपांतर केले आहे. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर ४१० डब्याचे रूपांतर आयसोलेशन कक्षात केले आहे.  मात्र हे आयसोलेशन कक्ष निरुपयोगी ठरले आहेत. 

एक आयसोलेशन कक्ष तयार करण्यासाठी ७७ हजार ६७८ रुपये खर्च येतो. मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये १२० आयसोलेशन कोच तयार करण्यासाठी ९३ लाख २१ हजार ३६० रुपये खर्च आला आहे, अशी माहिती अधिकाराखाली मिळाली आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एकूण ८९२ आयसोलेशन कक्ष तयार केले आहेत. मात्र याचा वापर शून्य आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून कोट्यवधी रुपये वाया जात आहेत, असे माहिती अधिकार कार्यकर्ते अजय बोस यांनी सांगितले.

पश्चिम रेल्वे मार्गावरील वर्कशॉपमध्ये आयसोलेशन कक्ष तयार आहेत. कोणत्याही आयसोलेशन कक्षाचे रूपांतर प्रवासी डब्यात केले नाही. आयसोलेशन कक्षात अजून एकही कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपचार झाला नाही. कारण यासंदर्भात कोणतीही मागणी केली नाही, अशी माहिती पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली तर आयसोलेशन कक्षाचे रूपांतर पुन्हा प्रवासी डब्यात केले होते. मात्र पुन्हा ४८२ आयसोलेशन कक्ष तयार आहेत. आतापर्यंत एकही कोरोनाग्रस्त रुग्णाचा उपचार केला नाही. राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे मागणी केल्यावर आयसोलेशन कक्ष पुरविण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली

Web Title: Even though there are no beds for coronaviruses in Mumbai, the isolation ward in the train is empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.