अखेर निवासी डॉक्टरांचे थकीत विद्यावेतन मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 06:16 AM2019-04-17T06:16:54+5:302019-04-17T06:17:14+5:30

अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणारे निवासी डॉक्टरांचे थकीत विद्यावेतन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून देण्यात आले आहे.

Eventually the resident doctors got the tiredness of the doctors | अखेर निवासी डॉक्टरांचे थकीत विद्यावेतन मिळाले

अखेर निवासी डॉक्टरांचे थकीत विद्यावेतन मिळाले

Next

मुंबई : अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणारे निवासी डॉक्टरांचे थकीत विद्यावेतन वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून देण्यात आले आहे. राज्यातील काही वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांना जानेवारीपासून तीन महिन्यांचे विद्यावेतन देण्यात आले नव्हते. यासंदर्भात निवासी डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडे पत्रव्यवहाराद्वारे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आले असून सोमवारी उशिरा मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींनी विद्यावेतन मिळाल्याची माहिती दिली.
थकीत विद्यावेतनासाठी मध्यवर्ती मार्ड संघटनेने ४ एप्रिल रोजी आंदोलन केले होते. मात्र, त्या वेळी विद्यावेतनासाठी निधी नसल्याचे संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांनी थकीत विद्यावेतनाचा प्रश्न निकाली न लावल्यास राष्टÑीय पातळीवर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्या वेळी आंदोलकांनी दिला होता. त्यानंतर आता सोमवारी थकीत विद्यावेतन देण्यात आल्याची माहिती मार्ड संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली.
काही वैद्यकीय महाविद्यालयांतील डॉक्टरांना दोन महिन्यांचे तर काही महाविद्यालयांना तीन महिन्यांचे थकीत वेतन देण्यात आले. उर्वरित काही महाविद्यालयांचे थकीत विद्यावेतन संचालनालयाकडून मंजूर करण्यात आले असून त्यांना ते लवकरच देण्यात येईल, असे संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
>आता लढा वाढीव वेतनासाठी
अकोला महाविद्यालयांना एक महिन्याचे तर आंबेजोगाई व लातूर येथील महाविद्यालयांना प्रत्येकी दोन महिन्यांचे विद्यावेतन देण्यात आल्याची मााहिती मध्यवर्ती मार्ड अध्यक्ष डॉ. कल्याणी डोंगरे यांनी दिली. थकीत विद्यावेतनाचा प्रश्न निकाली लागल्यानंतर आता वाढीव विद्यावेतनासाठी लढा उभारण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

Web Title: Eventually the resident doctors got the tiredness of the doctors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.