अखेर चिंता मिटली!

By admin | Published: October 1, 2014 01:10 AM2014-10-01T01:10:18+5:302014-10-01T01:10:18+5:30

मुंबईला पाणीपुरवठा करणा:या तलाव क्षेत्रत दमदार पावसाने हजेरी लावल्याने सातही तलावांत 3क् सप्टेंबर अखेर्पयत 14 लाख 11 हजार 298 दशलक्ष एवढा जलसाठा जमा झाला आहे.

Eventually the worry was over! | अखेर चिंता मिटली!

अखेर चिंता मिटली!

Next
>मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणा:या तलाव क्षेत्रत दमदार पावसाने हजेरी लावल्याने सातही तलावांत 3क् सप्टेंबर अखेर्पयत 14 लाख 11 हजार 298 दशलक्ष एवढा जलसाठा जमा झाला आहे. परिणामी मुंबईकरांची या वर्षीच्या पिण्याच्या पाण्याची चिंता अखेर मिटली आहे. गतवर्षी म्हणजे 2क्13 साली हाच जलसाठा 13 लाख 72 हजार 81क् दशलक्ष लीटर एवढा होता.
देशासह मुंबईत मान्सूनचे आगमन विलंबाने झाले होते. संपूर्ण जून महिना कोरडा गेल्याने मुंबईकरांवर जलकपातीचे संकट ओढावले होते. भविष्यात पाणी टंचाईचे संकट हेरून महापालिका प्रशासनाने 15 टक्के पाणी कपात घोषित केली होती. कालांतराने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात मुंबईला पाणीपुरवठा करणा:या तलाव क्षेत्रत समाधानकारक पाऊस पडल्याने महापालिकेला दिलासा मिळाला होता. आणि महापालिकेने पाणी कपात मागे घेतली होती. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही तलाव क्षेत्रत समाधनकारक पाऊस झाल्याने तुलसी, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा आणि विहार हे पाच तलाव दुथडी भरून वाहू लागले असून, मुंबईकरांसाठी या वर्षी पिण्याच्या पाण्याचा साठा पुरेसा आहे. (प्रतिनिधी)
 
तलावजलसाठा 
(दशलक्ष लीटर्समध्ये)
मोडक सागर 119क्81
तानसा 14क्121
विहार 2616क्
तुलसी782क्
अपर वैतरणा227क्47
भातसा7क्2496
मध्य वैतरणा188573
एकूण1411298

Web Title: Eventually the worry was over!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.