एव्हरेस्ट सर केलेल्यांना २५ लाख, मुंबईत होणार सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 06:02 AM2018-05-29T06:02:43+5:302018-05-29T06:02:43+5:30

मिशन शौर्यअंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे

Everest heads to 25 lakh, will be felicitated in Mumbai | एव्हरेस्ट सर केलेल्यांना २५ लाख, मुंबईत होणार सत्कार

एव्हरेस्ट सर केलेल्यांना २५ लाख, मुंबईत होणार सत्कार

Next

मुंबई : मिशन शौर्यअंतर्गत एव्हरेस्ट सर करणाऱ्या जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती चंद्रपुरचे पालकमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली़
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, या पाचही जणांना गृह विभागात नोकरी देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे़ ज्या विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट चढण्याचा प्रयत्न केला त्यांनाही प्रत्येकी १० लाख रुपये देऊन गौरविण्यात येईल़
१६ मे रोजी पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट शिखरावर चंद्रपूर आणि महाराष्ट्राचा ध्वज फडकविला़ या शौर्याची दखल प्रधानमंत्री नरेंद्र्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात घेतली.
अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने आदिवासी विकास विभागाने या विद्यार्थ्यांच्या उपजत धाडसाला ‘मिशन शौर्य’च्या माध्यमातून एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी उत्तर भारतातील महत्त्वाच्या संस्थांमध्ये प्रशिक्षित करण्यात आले होते. प्रारंभी ५० विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या चाचण्या घेऊन त्यातून १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.

ंचंद्रपुरात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या विद्यार्थ्यांना मोहिमेपूर्वी शुभेच्छा दिल्या होत्या़ खडतर चढाईनंतर अखेर पाच विद्यार्थी यशस्वी ठरले. यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये कविदास काठमोडे, उमाकांत मडावी, विकास सोयाम, प्रमेश आले आणि मनीषा धुर्वे यांचा समावेश आहे. हे विद्यार्थी मंगळवारी (दि़ २९) मुंबईत दाखल होणार असून राज्यपाल के़ विद्यासागर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे़

Web Title: Everest heads to 25 lakh, will be felicitated in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.