मुंबई महापालिकेच्या भगवती रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी हा जणू देवदूतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:15 AM2020-12-04T04:15:28+5:302020-12-04T04:15:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेच्या बोरीवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयात दाखल झालेले असंख्य कोरोना ...

Every employee of Mumbai Municipal Corporation's Bhagwati Hospital is like an angel | मुंबई महापालिकेच्या भगवती रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी हा जणू देवदूतच

मुंबई महापालिकेच्या भगवती रुग्णालयातील प्रत्येक कर्मचारी हा जणू देवदूतच

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात मुंबई महापालिकेच्या बोरीवली पश्चिम येथील भगवती रुग्णालयात दाखल झालेले असंख्य कोरोना रुग्ण नुसतेच बरे झाले नाहीत, तर त्यांच्या चेहऱ्यावर चांगली रुग्णसेवा मिळाल्याचे समाधान होते. विभागप्रमुख व आमदार म्हणून या नात्याने मी सातत्याने संपर्कात आहे. कोरोना काळातील रुग्णालयातील प्रत्येक कर्मचाऱ्यांची वागणूक ही जणू देवदूताप्रमाणेच होती. त्यामुळे येथील प्रत्येक डॉक्टर व कर्मचारी हे खरे देवदूतच आहेत, असे गौरवोद्गार आमदार विलास पोतनीस यांनी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना आयोजित कोविड योद्धा सत्कार सोहळ्यात नुकतेच काढले.

शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने श्री हरिलाल भगवती रुग्णालयातील कोरोना महामारीच्या काळात सातत्याने रुग्णसेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा कोविड योद्धा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विलास पोतनीस, शिवसेनाप्रणित म्युनिसिपल कामगार सेनेचे कार्याध्यक्ष सुनील चिटणीस, संजय वाघ, महेश गुरव, वृषाली परुळेकर, विधानसभा संघटक बाळकृष्ण ढमाले, शाखाप्रमुख भूपेंद्र कवळी, महिला शाखा संघटक ममता मसुरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात कोविडमुळे शहीद झालेल्या भगवती रुग्णालयातील दिवंगत परिचारिका हेमांगी कदम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवती रुग्णालयातील स्थानिक पदाधिकारी सचिन सांगळे, जगदीश चव्हाण, अतुल आढे, मीना रजपूत, शिल्पा राऊत यांनी परिश्रम घेतले.

----------

Web Title: Every employee of Mumbai Municipal Corporation's Bhagwati Hospital is like an angel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.