प्रत्येक घर कामगारांची नोंदणी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:05 AM2021-04-17T04:05:37+5:302021-04-17T04:05:37+5:30
मुंबई : नोंदणीकृत घरेलू कामगार, फेरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगार यांनी नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आधार नंबरशी ...
मुंबई : नोंदणीकृत घरेलू कामगार, फेरीवाले, रिक्षा चालक, बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगार यांनी नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह आधार नंबरशी लिंक करणे गरजेचे आहे. सध्या प्रत्येक घर कामगारांची नोंदणी होऊ शकते, असा दावा राज्य शासनाने केला आहे. दरम्यान, अन्नधान्य उपलब्धतेबरोबरच कार्यरत शिवभोजन थाळी केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी मैदानाचा वापर केला जाणार आहे.
कामगार आणि नागरिकांना अन्नधान्य उपलब्ध व वितरण करून देण्याबाबत प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधी यांची समिती तयार करण्यात येणार आहे. असंघटित बांधकाम कामगार, घरेलू कामगार, फेरीवाले अशा सर्वसामान्य नागरिकांसाठी शासनाने जाहीर केलेली मदत मिळण्यासाठी सामाजिक संस्था समन्वयाची भूमिका ठेवून काम करणार आहेत. नागरिकांना मदत करण्यासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणती संस्था काय काम करते आहे त्याचे मॅपिंग सामाजिक संस्था करणार आहेत.
रेशन कार्ड असणाऱ्या व नसणाऱ्या नागरिकांसाठी, तसेच केशरी रेशन कार्डधारकांना अन्नधान्याची योजना चालू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. नोंदणी आणि अस्तित्वासाठी म्हणजेच डेटा बेस तयार करण्यासाठी महानगरपालिका क्षेत्रात जिल्हास्तरावर समन्वय समिती तयार करत मदत, पुनर्वसन विभागाने विभागीय आयुक्त तथा जिल्हा स्तरावर सामाजिक संस्थांचे सहकार्य घेतले जाणार आहे.