पावसाळ्यात मुंबईकरांची दैनाच, पूल बंद केल्याने वाहतूककोंडी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 03:39 AM2019-06-09T03:39:16+5:302019-06-09T03:39:40+5:30

पूल बंद केल्याने वाहतूककोंडी । महापालिकेवर सर्व बाजूने टीका

Every morning, during the monsoon season, the bridge closed due to traffic constraints | पावसाळ्यात मुंबईकरांची दैनाच, पूल बंद केल्याने वाहतूककोंडी

पावसाळ्यात मुंबईकरांची दैनाच, पूल बंद केल्याने वाहतूककोंडी

Next

मुंबई : मुंबई महापालिकेने दुरुस्तीसाठी पूल बंद करण्याचे काम आणखी वेगाने हाती घेतले आहे़ हे काम नेमके पावसाळ्याच्या तोंडावर सुरु होत आहे. परिणामी, दुरुस्तीसाठी खोदण्यात आलेले रस्ते, दुरुस्तीसाठी बंद करण्यात आलेले पूल; या सर्व घटकांमुळे मुंबईची आणखी दैना होणार आहे. मुंबईकरांना यंदाचा पावसाळा दरवर्षीप्रमाणे तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत़

पालिकेने पाणी तुंबणार नसल्याचे कितीही दावे केले तरी हिंदमाता, किंग्ज सर्कल, सायन, अंधेरी व इतर काही ठिकाणी पाणी तुंबतेच़ मुंबईचा वेग मंदावतो़ वाहतूककोंडी होते़ हा सर्व प्रकार दरवर्षी होतो़ पूल बंद केल्याने सर्व वाहतूक मुख्य रस्त्यावरूनच सुरू राहिल व पावसाळ्यात त्याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत़ पालिकेने २९ पुलांचे पाडकाम, पुनर्बांधणीचे काम सुरू केले असून, २९ पैकी ८ पूल पाडण्यात आले आहेत तर १२ पुलांचा वापर बंद करण्यात आला आहे. १२ पूलही पाडण्यात येणार असून, उर्वरित ९ पूल लवकरच बंद करत पाडण्यात येणार आहेत. मात्र हे करताना मुंबईकरांच्या होत असलेल्या गैरसोयीकडे पालिकेने दुर्लक्ष केल्याने नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांची सर्वच बाजूंनी कोंडी होणार असल्याने पालिका आता टीकेची धनी होत आहे.
घाटकोपरमधील पूल अचानक बंद करण्यात आला. परिणामी, लोकांचे हाल झाले. येथे प्रचंड वाहतूककोंडी झाली. कांदिवलीतील पूल अचानक बंद करण्यात आला. परिणामी, विद्यार्थी, रहिवाशांचे हाल सुरू आहेत. किंग्ज सर्कलचे दोन्ही पूल बंद करण्यात आले. परिणामी, लोकांना त्रास झाला. मुंबई आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर कुर्ला येथील कमानीपासून पुढे विक्रोळी परिसरात मेट्रोचे काम सुरू आहे. शिवाय एलबीएस मार्गावर ठिकठिकाणी रस्ते दुरुस्तीसह फुटपाथचे काम सुरू आहे. परिणामी, एलबीएस अरुंद झाला आहे. विशेषत: कमानी सिग्नल आणि मायकल शाळेजवळच अरुंद झालेल्या एलबीएसहून एकावेळेला एकच वाहन जाईल, अशी अवस्था आहे.
परिणामी, येथे सकाळ आणि सायंकाळी होत असलेल्या वाहतूककोंडीने वाहनचालकांना मनस्ताप होत आहे. याच परिसरात कमानीपासून बैलबाजार परिसराला जोडण्यात आलेला काळे मार्ग कमानी ते बैलबाजार असा एक दिशा बंद करण्यात आला आहे. परिणामी, कमानीहून बैलबाजार गाठण्यासाठी मगन नथुराम मार्गाला वाहनांना वळसा घालावा लागत आहे. हा वळसा घालताना अवजड वाहनांना अशोक लेलँड येथे एलबीएसहून वळण घ्यावे लागते. आणि याच वळणादरम्यान एलबीएस दोन्ही बाजूंकडून ब्लॉक झाल्याने येथील एलबीएसवरील दोन मार्ग आणि मगन नथुराम मार्ग असे तीन मार्ग एकाचवेळी बंद पडतात.
लोअर परळचा पूल पाडण्यात आल्यापासून येथील वाहतुकीचे तीनतेरा वाजले आहेत. करी रोड पश्चिमेकडून परळ गाठण्यासाठी लालबागमार्गे किंवा महालक्ष्मी मार्गे वाहनचालकांना प्रवास करावा लागत आहे. पूर्व आणि पश्चिम अशी कनेक्टिव्हिटी तुटल्याने नागरिकांच्या मनस्तापात प्रचंड भर पडली आहे.

लोकप्रतिनिधी अंधारात
सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादा रस्ता किंवा पूल बंद झाल्यानंतर स्थानिकांसह नागरिकांकडून लोकप्रतिनिधींना याबाबत माहिती विचारली जाते. मात्र लोकप्रतिनिधींना याबाबत पुसटशीही कल्पना नसते. परिणामी, लोकप्रतिनिधींवर नागरिकांकडून टीका केली जाते.

च्मुंबई महापालिकेच्या अखत्यारीत ३४४ पूल आहेत.
च्३०४ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट प्रगतिपथावर आहे.
च्स्ट्रक्चरल आॅडिटनुसार २९ पूल धोकादायक आहेत.

चार महिने हाल
पूल बंद करताना नियोजन, उपाययोजना करायला हव्यात. महापालिकेकडून त्या केल्या जात असल्या तरी त्या पुरेशा नाहीत. महत्त्वाचे म्हणजे आता अनेक पूल बंद करण्यात येत असल्याने पावसाळ्यातील चार महिने मुंबईकरांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

च्आॅक्टोबर २०१६ ते आॅगस्ट २०१८ दरम्यान, २९६ पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट
च्संरचनात्मक परीक्षण करण्यात आले. परीक्षण करताना नुकतेच बांधलेले, हस्तांतरित झालेले.
च्आॅडिटवेळी ४८ पूल वगळता २९६ पुलांचे आॅडिट.
च्आॅडिटअंती १४ पूल धोकादायक.

पाडण्यात आलेले पूल
पूल प्रकार सद्य:स्थिती
यल्लो गेट पूल पादचारी पाडला
महर्षी कर्वे रोड, चंदनवाडी (दक्षिण) पादचारी पाडला
महर्षी कर्वे रोड, चंदनवाडी (उत्तर ) पादचारी पाडला
खैरानी रोडवरील हरी मशीद नाल्यावरी पूल वाहतूक पाडला
रमाबाई पाडा गुरुनानक नगर, मुलुंड कॉलनी पादचारी पाडला
संत मुक्ताबाई हॉस्पिटलजवळील बर्वे नगर पादचारी पाडला
रेनीसन्स हॉटेलजवळील पूल, पवई पादचारी पाडला
बंद करण्यात आलेले पूल
पूल प्रकार सद्य:स्थिती
हंस भुग्रा मार्ग, पाइपलाइन सर्विस रोड पूल वाहतूक बंद
धोबी घाट, मज्जास नाला पूल वाहतूक बंद
वालभट्ट नाला येथील पूल, वालभट्ट रोड, गोरेगाव (पूर्व) वाहतूक बंद
विठ्ठल मंदिर, ईरानी वाडी येथील पूल, रगडा पाडा वाहतूक बंद
एस.व्ही.पी. रोड, कृष्ण कुंज बिल्डिंगजवळील पूल वाहतूक बंद
आकुर्ली रोड येथील पूल, हनुमान नगर, धर्मराज डेरीजवळ वाहतूक बंद
गांधी नगर, कुरार व्हिलेज पूल वाहतूक बंद
पिरामल नाला, लिंक रोड वाहतूक बंद
चंदावाडकर नाला १२० फूट लिंक रोड, मालाड वाहतूक बंद
एस.बी.आय. कॉलनी, वैभव को-आॅप. हाउ. सो. लि. वाहतूक बंद
रतन नगरपासून दौलत नगर पूल वाहतूक बंद
लक्ष्मी बाग कल्वर्ट वाहतूक बंद
नीलकंठ नाल्यावरील पूल, घाटकोपर वाहतूक बंद

बंद होणारे पूल
पूल प्रकार सद्य:स्थिती
मेघवाडी नाला, श्यामनगर वाहतूक बंद करणार
वांद्रे धारावी रोड पूल वाहतूक बंद करणार
प्रेम नगर नाला, एस.व्ही. रोड, वाहतूक बंद करणार
बाटा शोरूम, मालाड
ओशीवरा नाला, एस.व्ही. रोड वाहतूक बंद करणार
फॅक्टरी लेन, बोरीवली वाहतूक बंद करणार
पँथर नगरजवळील, वाहतूक बंद करणार
विक्रोळी (पूर्व)
उर्वरित
वाकोला नाल्यावरील वाहतूक एमएमआरडीएद्वारे
हंस भुग्रा मार्गावरील पूल कार्यवाही
जुहू तारा रोड पूल वाहतूक वापरात
बिहारी टेकडी ब्रिज वाहतूक बांधकाम
कार्यवाही सुरू

आॅक्टोबर २०१६ ते आॅगस्ट २०१८ दरम्यान धोकादायक आढळलेले १४ पूल व दुसºया आॅडिटवेळीही धोकादायक आढळलेले पूर्व व पश्चिम उपनगरातील
१५ पूल; यानुसार एकूण २९ पूल धोकादायक समोर आले.

च्८१ पुलांच्या संरचनात्मक परीक्षणासाठी परीक्षकांची नेमणूक करण्यात आली.
च्२९ पुलांपैकी ३ पुलांचे पुनर्बांधणीचे कार्यादेश देण्यात आले.
च्७ पुलांची माहिती स्थायी समितीला देण्यात आली.
च्५ पुलांबाबत निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

Web Title: Every morning, during the monsoon season, the bridge closed due to traffic constraints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.