मुंबई : शासनाच्या रेशन दुकानात मोफत किंवा स्वस्त धान्य घेताना बोटांचे ठसे ई-पॉस मशीनवर येत नाहीत. त्यामुळे रेशन धान्य दुकानांतून रिकाम्या हातांनी लाभार्थी परत जात असल्याच्या तक्रारी आहेत. त्यावर उपाय म्हणून आता प्रत्येक स्वस्त धान्य दुकानात ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे. त्यामुळे डोळे स्कॅन करून रेशन दिले जाणार आहे.
२३ लाख जणांना मोफत रेशन-
मुंबई शहरात शासनाच्या स्वस्त मोफत धान्य वितरणप्रणाली अंतर्गत जवळपास २३ लाख ५५ हजार ४४२ रेशनकार्डधारक आहेत. या सर्वांना नियमानुसार मोफत रेशन देण्यात येते.
‘आय स्कॅनर गन’-
दुकानात आता ‘आय स्कॅनर गन’ असणार आहे. २ जी ऐवजी आता ४ जी ई पॉस मशीन रेशन दुकानात येणार आहे. त्यावर डोळे स्कॅन करून मिळणार आहेत.
मुंबई आणि उपनगरातील शिधापत्रिकाधारकांची संख्या एकूण - २३ लाख ५५ हजार ४४२
काहीजणांच्या बोटांवरील रेषा पुसट होत असतात. विशेषतः धुणीभांडी करणाऱ्या महिला, गवंडी काम करणारे व्यक्ती, कामगार, वृद्धांना ही समस्या जाणवते.
अशा लाभार्थींना कुटुंबातील अन्य व्यक्तींना आणून त्यांचे ठसे देऊन धान्य घ्यावे लागते, असे मुंबई उपनियंत्रक शिधा वाटप आणि पुरवठा विभागाचे म्हणणे आहे.